pub-7425537887339079
ब्रेकिंग

अपघातात महिलेचा मृत्यू, अल्पवयीन वाहन चालकांमुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात.

0 4 4 9 7 7
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25

उरण शहरासह ग्रामीण भागात अल्पवयीन मुलांकडून दुचाकी वाहने चालविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या अल्पवयीन वाहनचालकतेचा फटका नागाव येथील एका कुटुंबाला बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी नागाव-म्हातवली मुख्य मार्गावरील स्टार कॉम्प्लेक्स परिसरात एका अल्पवयीन मुलाने नॉन गियर स्कुटर चालवत प्रथम केगाव येथील प्रशांत दर्णे यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर शाळेत लहान मुलाला घेऊन जाणाऱ्या नागाव काठेआळी येथील हर्षदा हेरंब म्हात्रे यांना जोरदार धडक दिली. या अपघातात हर्षदा म्हात्रे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. अपघातानंतर त्यांना तातडीने खारघर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर त्यांचे दिनांक २२ जून २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे नागाव परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित मुलाच्या पालकांवर व गाडी मालकावर मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम १९९ A व इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेनंतर उरण परिसरात अल्पवयीन वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सकाळच्या शाळांच्या वेळेत, क्लासेस परिसरात, बाजारपेठांमध्ये तसेच पीरवाडी समुद्रकिनाऱ्यासह विविध भागांत अल्पवयीन मुले-मुली दुचाकी वाहने चालविताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अनेक जण हेल्मेटशिवाय, ट्रिपल सीट आणि भरधाव वेगाने वाहने चालवताना दिसत आहे. याबाबत उरण पोलीस व वाहतूक विभागाने शाळा, महाविद्यालये, क्लासेस परिसर आणि प्रमुख चौकांमध्ये विशेष मोहीम राबवून अल्पवयीन वाहनचालकांवर व पालक आणि गाडी मालकावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अपघातात मृत्यू झालेल्या हर्षदा हेरंब म्हात्रे या आपल्या लहान मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. एका निष्पाप महिलेचा जीव गेल्यानंतरही प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल आता उरणकर नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे