pub-7425537887339079
ब्रेकिंग

अटल सेतू जवळील उरण तालुक्यातील चिर्ले येथे बेकायदेशीर व अनधिकृतपणे डेंब्रिज टाकणाऱ्या मुंबई मधील दोन डंपर चालकावर गुन्हा दाखल.

अनधिकृत व बेकायदेशीर डेंब्रिजचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. वारंवार घटना घडत असल्यामुळे योग्य उपाययोजनाची गरज.

0 4 2 5 7 8
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.30

उरण मधील चिर्ले येथे डेंब्रिज टाकणाऱ्या मुंबई मधील दोन वाहन चालकांना प्रत्यक्ष जागेवर पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिनांक २४/०४/२०२६ रोजी वरिष्ठ अधिकारी यांचे आदेशानुसार सुरक्षा रक्षक तसेच भरारी पथक कारवाई गस्त करीत असताना कार्यकारी अभियंता राजीव कोलप यांच्या सुचने नुसार बेकायदेशीर डेंब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.अटल सेतुजवळ ब्रिज जेथे संपतो त्याठिकाणी चिरले येथे डेब्रिज टाकणारे वाहण असल्याची माहीती प्राप्त झाल्या नंतर सदर डेब्रिज टाकणारे वाहनांवर कारवाई करा असे आदेश मिंळाल्यानतर अटल सेतु ब्रिज संपतो त्या ठिकाणी चिरले ता. उरण, जि. रायगड येथे १९:३० वा च्या दरम्यान भरारी पथक पोहोचले असता डंपर क्र. 1) MH 01 EW 1486, 2) MH 01 CB 8050 हे सिडकोच्या अधिसुचीत क्षेत्रातील जागेत डंपरमधील डेब्रीज अनधिकृतपणे वाहतुक करून डेब्रीज टाकत असताना आढळून आले. सदर डंपर वरील चालकास भरारी पथकाने थांबवून त्यांचे नाव विचारले असता 1) डंपर नं MH 01 EW 1486, वरील चालक याने त्याचे नाव महेश बाबु कुंभार, वय 31 वर्ष, व्यवसाय-चालक, रा. न्यु पारेख कंपाउंड बिल्डींग नं 11 बी, रूम नं 103 लोखंडे मार्ग, गोवंडी मुंबई असे सांगितले तर 2) MH 01 CB 8050 वरील चालक याने त्याचे नाव शकीर सज्जद अली वय 27 वर्ष, व्यवसाय-चालक, रा. शांतीनगर फरदोस कालनी, एसपी रोड, वडाळा मंबई असे सांगीतले. त्यांनतर भरारी पथकाने सदर ठिकाणी सुरक्षा जवान यांना बोलावून त्यांच्या मदतीने भरारी पथकाने सदर दोन ही डंपर जासई पोलीस चौकी येथे आणून उभे केले आहेत. दिंनाक २४/०४/२०२६ रोजी सायंकाळी १९:३० वा. सुमारास, अटले सेतु ब्रिज संपतो त्या ठिकाणी चिरले ता. उरण, जि. रायगड येथे यातील आरोपी डंपर चालक यांनी डंपर नं. 1) MH 01 EW 1486, 2) MH 01 CB 8050 मधील डेब्रीज अनाधिकृतपणे वाहतुक करून ये जा करणा-या तसेच स्थानिक लोकांच्या आरोग्यास व जिवीतास हानी होईल अशा बेकायदेशीर व बेजबाबदार पध्दतीने टाकून सिडकोच्या अधिसुचीत क्षेत्रातील जागेचे विद्रुपीकरण करण्यास बेजबाबदारीचे कृत्य करणेस कारणीभूत झाले म्हणून भरारी पथकाने चालकांवर कायदेशीररित्या गुन्हा नोंदविला आहे.भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३कलम २८०,३(५),महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ कलम ३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम १२० अंतर्गत डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणाचा अधिक तपास सब इन्स्पेक्टर गोविंद दत्तात्रेय केंद्रे करीत आहेत.अनधिकृत व बेकायदेशीर डेंब्रिजचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा वारंवार घटना घडत असल्यामुळे योग्य ते कायमस्वरूपी उपाययोजनाची गरज आता निर्माण झाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे