pub-7425537887339079
ब्रेकिंग

राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल, टेंभुर्णी येथे विद्यार्थ्यांसमवेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी

0 4 7 1 0 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.25

राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल, टेंभुर्णी येथे आषाढी एकादशीचा पवित्र सण मोठ्या भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन व विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिक मूल्यांची जपणूक व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष मा. संजयजी लहाने सर यांच्या हस्ते भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात दिंडी काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करणारी भाषणे सादर केली. तसेच भक्तिगीते, नृत्य आणि विठ्ठल भक्तीवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचा इतिहास, संतपरंपरा आणि भक्ती, समता, सेवा व सदाचार या मूल्यांचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी समाजात बंधुभाव, सद्भावना आणि संस्कार जपण्याची प्रतिज्ञा केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 1 0 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे