pub-7425537887339079
ब्रेकिंग

 वेध रायगडाचा प्रतिष्ठान महाराष्ट्र व इतिहास प्रबोधन संस्थेतर्फे रायगडाची दिवाळी हा अभिनव उपक्रम, पाचव्या वर्षात पदार्पण

0 5 1 5 0 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.4

राजधानी रायगड म्हणजे महाराष्ट्राच्या मनाची शान, छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी म्हणजे रायगड, इतिहास प्रबोधन संस्था आणि वेद रायगडाचा प्रतिष्ठान या संस्था सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा इतिहास हा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जगातील पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन इतिहास प्रबोधन संस्थेने आयोजित केले होते. तर वेद रायगडाचा या प्रतिष्ठानने जगातील पहिला 98 लेखांचा श्री शिवचरित्र पुष्पांजली हा ग्रंथ प्रकाशित केला होता. प्रतापदुर्ग, सिंहगड, सिंधुदुर्ग पन्हाळा या वेगवेगळ्या दुर्गांच्या अभ्यासाची जबाबदारी देखील इतिहास प्रबोधन संस्थेने घेतलेली आहे, *वेध रायगडाचा* हा रायगडाचा इतिहास सह्याद्रीचा जिव्हाळा पन्हाळा हा पन्हाळ्याचा इतिहास, साल्हेर तख्त, सिंधुदुर्ग आणि प्रतापगड ही पुस्तके देखील इतिहास प्रबोधन संस्थेने प्रकाशित केलेली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरील डायरी शिवप्रताप, तसेच शिवाजी महाराजांच्या चरित्रावरची परीक्षा, सातत्याने सरक 54 व्याख्याने असे अनेक उपक्रम संस्था रावीत असते त्याच पार्श्वभूमी वरती मागील चार वर्षापासून सातत्याने दुर्गराज रायगडावरती जे कुणी रायगड वासी आहेत ज्यांनी अडचणीच्या काळामध्ये रायगड सांभाळून ठेवला त्यांच्या वारसदारांची दीपावली ही आनंदाने व्हावी म्हणून इतिहास प्रबोधन संस्था सातत्याने कार्य करीत आहे, दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक भगिनीस भाऊबीजेची एक साडी आणि दिवाळीचे फराळ वाटप केले जाते, याही वर्षी हा उपक्रम दिनांक 5 नोव्हेंबर 2026 रोजी दुर्गराज रायगडावरती होळीच्या माळावरती हा सोहळा आयोजित केलेला आहे. या सोहळ्यासाठी इतिहास प्रबोधन संस्थेचे विश्वस्त रवींद्र पाटील सचिव भारतीय साठे व सदस्य भारतीय खोतकर उपस्थित राहणार आहेत. या सर्व उपक्रमासाठी इतिहास प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य एल पी देशमुख आणि वेद रायगडाचा या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक दत्ता देशमुख तसेच या संस्थेचे सहसचिव राजेश आढाव उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मधुकर साठे यांनी परिश्रम घेतले आहेत महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या सहकार्याने तसेच संस्थेच्या मदतीने हा उपक्रम साकार केला जातो. रायगडांच्या परिसरातील गरिबांना त्या परिसरात राहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यातील डोंगरदऱ्यात राहणाऱ्या लोकांची दिवाळी गोड व्हावी हा एवढा पाठीमागील उद्देश आहे. फराळ ब्लॅंकेट साडी चोळी इतर इत्यादी वस्तू स्वरूपामध्ये ही संकल्पना इतिहास प्रबोधन संस्था व विविध रायगडाचा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे सर्वेसर्वा रवींद्र पाटील यांच्या संकल्पनेतून साकारली. या संकल्पनेला संस्थेच्या सचिव भारती ताई साठे, प्राचार्य लक्ष्मणराव देशमुख, राजेश आढाऊ,सर, यांच्या मदतीने व अनेक संस्थेच्या सहकार्याने यासाठी मदत म्हणून पुढे आलेले आहेत यामध्ये, दिनेश कुलट सर, प्रा. मधुकर साठे, छत्रपती संभाजीनगर, विनोद रायपुरे, सीमाताई तांबोळकर, डॉक्टर नितीन सराफ, प्राध्यापक स्मिता जयकर, विपुल आवारी, संजय पाटील, शिवाजी पाटील, एडवोकेट अनिल पाटील, Arts सोनवणे, प्राध्यापक डॉक्टर देवगोजी ताई, भूषण जोशी, आरोही पाटील, गजानन पाटील, प्रमोद सूर्यवंशी, तसेच दोन्ही संस्थांचे विविध पदाधिकारी सदस्य आणि संपर्कात असलेले सर्व इतिहास प्रेमी कार्यकर्ते यामध्ये सहभागी आहेत. त्यांच्या या कार्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या राजधानीच्या परिसरामध्ये गरिबांसाठी चाललेली ही मोहीम अत्यंत स्तुत्य असून अशा प्रकारची योजना ही या दोन्ही संस्थांकडून सर्वप्रथम राबविण्यात आले आणि तिला कायमस्वरूपी करण्यात आले आहे. आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना रवींद्र पाटील यांनी सांगितले की ही योजना कायमस्वरूपी राहणार असून दर दिवाळीला अशा प्रकारच्या योजना राबवल्या जातील आणि त्या परिसरातील गरीब रहिवाशांना अशा प्रकारची मदत दिल्या जाईल. सद्यस्थितीमध्ये दुष्काळाच्या झाडाप पोहोचणार आहेत याच्यावरही आमचा विचार चालू आहे अशा पद्धतीचा विचार त्यांनी आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना केला त्यामध्ये त्यांना सहकार्य करण्यासाठी वेध रायगडाचा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अध्यक्ष प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर, लक्ष्मणराव देशमुख जळगावकर, भारतीताई साठे या सहकाऱ्यांचे मुलाचे योगदान लाभणार असून त्यावर कायमस्वरूपी योजनेसाठी ते काम करत आहे अशा आशयाची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 5 0 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे