pub-7425537887339079
ब्रेकिंग

​वयाच्या 67 व्या वर्षी ‘उमलिंग ला’ सर करणारे जवाहर काबरा यांचे टेंभुर्णी येथे जंगी स्वागत,अभिनंदन

​‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाल्याबद्दल टेंभुर्णी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सत्कार

0 4 8 6 8 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8

कोणतेही काम करण्यास वयाचे बंधन नसते असेच काही काम करणारे जिद्द, प्रचंड इच्छाशक्ती आणि अथक परिश्रमाच्या बळावर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर अशक्य वाटणारे ध्येय साध्य करता येते, हे 67वर्षीय ज्येष्ठ सायकलिस्ट श्री. जवाहर काबरा सर यांनी दाखवून दिले आहे. जगातील सर्वाधिक उंचीवरील मोटार रस्ता मानल्या जाणाऱ्या अशक्य असे लडाखमधील ‘उमलिंग ला पास’ (१९,०२४ फूट) या अतिशय खडतर आणि आव्हानात्मक चढाईवर त्यांनी सायकलने यशस्वी प्रवास पूर्ण केला. त्यांच्या या अद्वितीय विक्रमाची दखल घेत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२६’ (India Book of Records) मध्ये त्यांची अधिकृत नोंद झाली असून, त्यांना ‘आयबीआर अचिव्हर’ सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
​त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल टेंभुर्णी येथील मॉर्निंग ग्रुपच्या वतीने त्यांचे उत्साहात व जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते काबरा सरांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
​या स्वागतप्रसंगी मॅरेथॉन अल्ट्रा रनर पंडित सुरशे, धीरज काबरा, मनीष सोमानी, प्रदीप काबरा, अलकेश सोमानी यांच्यासह मॉर्निंग ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
​उमलिंग ला पास हा मार्ग समुद्रसपाटीपासून १९,०२४ फूट उंचीवर असून तिथे अत्यंत कमी प्राणवायू (ऑक्सिजन), गोठवणारी थंडी आणि तीव्र चढ-उतारांचा सामना करावा लागतो. अशा अतिदुर्गम मार्गावर वयाच्या ६७ व्या वर्षी पॅडल मारत सायकल मोहीम फत्ते करणे हे केवळ कौतुकास्पद नसून संपूर्ण समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
​”काबरा सरांची ही कामगिरी सर्वांसाठीच अभिमानास्पद असून, वाढत्या वयातही तंदुरुस्ती आणि सायकलिंगच्या माध्यमातून त्यांनी तरुणांसमोर एक मोठा आदर्श निर्माण केला आहे,”अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. या यशाबद्दल काबरा सरांवर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 6 8 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे