पुण्यनगरीत लिपाणेनगर येथे वारकरी दिंडीचे स्वागत

पुणे/आत्माराम ढेकळे,दि.14
आळंदी,देहु येथुन पंढरपुरकडे संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोबत अनेक दिंड्या प्रस्थान करतात.व या पायी दिंडीतील वारकरी मंडळीचे पुण्यनगरीतील विविध ठिकाणी स्वागत करुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.असेच वारकरी दिंडीचे लिपाणेनगर येथे स्वागत करण्यात आले, दरवर्षी विसवळे परिवार वारकरी दिंडीचे स्वागत करतात.यावर्षी पंढरीच्या वारीतील ‘हर हर महादेव पायी दिंडी क्रं.१९२,दिंद्रुड,ता,माजलगाव जि.बीड या दिंडीतील वारकरी मंडळीचे स्वागत लिपाणेवस्ती परिसरातील अमितदादा थोपटे यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते.याप्रसंगी आयोजनातील श्री.रामेश्वर विसवळे व सौ.शितल रामेश्वर विसवळे यांनी विठुमाऊलीच्या मुर्तीचे पूजन केले.तरश्री.प्रकाश पळसकर,सौ.सुनंदा प्रकाश पळसकर श्री.गणेश ढेकळे ,सौ.गीता गणेश ढेकळे श्री.नागेश पळसकर सौ,सुरेखा नागेश पळसकर आदी भाविकांनी महाआरती केली. माजलगावचे ज्येष्ठ वारकरी श्री. कोंडिबा विसवळे यांनी सर्व वारकरी मंडळीचे स्वागत केले. प्रामुख्याने या कार्यक्रमात भजन ,गौळणी गायन झाले.यामध्ये भोकरदनचे प्रसिद्ध भजन गायक नागेश पळसकर यांनी मनमोहक आवाजात भजन ,गौळण सादर केले.भजनी मंडळातील वारकरी मंडळीनी यास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमात महिला व पुरुषांनी फुगडी ,नृत्य सादर केले.वारकरी मंडळीचे आयोजकांनी टाॕवेल,टोपी देऊन सत्कार केला.याप्रसंगी उपस्थित माऊलीबाबा व दिंडीचालक उध्दव महाराज ठोंबरे यांची सदिच्छा भेट -दर्शन पत्रकार आत्माराम ढेकळे व नागेश पळसकर यांनी घेऊन समाधान व्यक्त केले.याप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.वारकरी मंडळी व स्थानिक भाविक भक्त यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यास सामाजिक कार्यकर्ते दत्ता विसवळे,धोंडीराम भाग्यवान ,सचिन सेवक अशोक गाणार आदींनी परिश्रम घेतले.




