स्व. विनोद कळंबे यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य सदैव प्रेरणादायी

टेभुर्णी/दत्ता देशमुख,दि.27
टेंभुर्णी – जाफराबाद तालुक्यातील आदर्श शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते स्व. विनोद कळंबे यांचे शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारितेतील योगदान सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. युगंधर प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब व गरजू लोकांना केलेली आर्थिक मदत ही सर्वांच्याच कायम स्मरणात राहील. शैक्षणिक व सामाजिक कार्यातील त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. असे मत तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष पी.जी. तांबेकर यांनी व्यक्त केले. आदर्श शिक्षक स्व. विनोद कळंबे यांचे नुकतेच एका अपघातात निधन झाले. गुरुवारी येथील मानव सेवा मंडळातर्फे येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयात आयोजित शोकसभेत ते श्रद्धांजली अर्पण करताना बोलत होते. यावेळी आदर्श शिक्षक शेख जमीर, माजी उपसरपंच फैसल चाऊस, प्रा. दत्ता देशमुख, शिक्षक सखाराम बोरकर, पवन झोरे, अलकेश सोमानी, डॉ. रमेश मोठे, प्रदीप मघाडे, मधुकर गोफणे, शेख साबेर, सावता तिडके, नसीम शेख आदींनी या शोकसभेत स्व. विनोद कळंबे यांच्या शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता जीवनातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक म. फुले सार्वजनिक वाचनालयाचे रावसाहेब अंभोरे यांनी केले. या शोकसभेत मानव सेवा मंडळाचे प्रा. शैलीप्रकाश वाघमारे, गोविंद जाधव, संतोष शिंदे, गजानन डोमळे, संजय निकम, सुनील अंभोरे,भागाजी वाघमारे, पत्रकार सिताराम भाले, डॉ. अविनाश सुरसे, पत्रकार अशोक पाबळे, सुनील जोशी, फकरू कुरेशी, माजी उपसरपंच रहेमान शहा, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन झोरे, पत्रकार शेख अशपाक, भिकाजी खांडेभराड, प्रदीप काबरा, अर्जुन राऊत, डॉ. हरणे, अनिकेत अंभोरे, धनंजय निकम, उमेश वराडे, शाहरुख पठाण, आशिष पैठणे, रामू जंगले, दगडूबा तांबेकर, शुभम मुळे, बालाजी शेवाळे, तय्यब चाऊस आदींसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. फोटो – आदर्श शिक्षक स्व. विनोद कळंबे यांना श्रद्धांजली अर्पण करताना मानव सेवा मंडळ पदाधिकारी व ग्रामस्थ.

