pub-7425537887339079
ब्रेकिंग

जाफराबाद तालुक्यास स्वतंत्र गट विकास अधिकारी नेमावा –पंढरीनाथ मस्के

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.23

जाफराबाद तालुका जालना जिल्ह्यातील ग्रामीण मागास असलेला तालुका आहे. या तालुक्याकडे नेतेमंडळाचे विशेष लक्ष नसते. लक्ष असते ते विविध योजना कंत्राटदारापर्यंत कशा पोहोचतील यासाठी. नित्य नियमाचे कामे ही अधिकारी वर्गाकडून करून घेतल्या जात असतात. सध्या जिल्हा परिषद अस्तित्वात नाही. प्रशासकीय कामे हे अधिकाऱ्याकडूनच करून घेतले जातात. जाफराबाद तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरीनाथ मस्के पाटील यांनी गटविकास अधिकारी यांना एक निवेदन दिले त्या निवेदनाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जालना, पोलीस अधीक्षक जालना यांना देण्यात आलेली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की जाफराबाद तालुक्याचे गट विकास अधिकारी सतत गैरहजर राहत असल्याने विविध विकास कामे खोळंबलेली आहेत. प्रशासकीय कामाबरोबरच विविध प्रकारचे प्रकारची सामान्य लोकांचे कामे सुद्धा खोलंबलेली आहे. विविध विकास योजना, घरकुलांना मिळणारा निधी, ग्रामपंचायत कार्यालयांना मिळणारा निधी, विविध विकास कामांचा निधी प्रलंबित आहे. संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासकीय कार्य करण्यात यावी अशा प्रकारची विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केलेले आहे. वाढदिवसाच्या स्वतंत्र गट विकास अधिकारी न नेमल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे पंढरीनाथ मस्के पाटील यांनी आमच्या वृत्त प्रतिनिधी सांगितले त्याचबरोबर आंदोलनाच्या संदर्भात निवेदन केलेले आहे. या निवेदनावर पंढरीनाथ मस्के पाटील, संजय शिंदे, विजय भाटमोडे यांच्या साह्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे