सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र द्वारे रक्तदान शिबीर संपन्न. रक्तदान शिबिराला मिळाला उत्तम प्रतिसाद.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27
रक्ता अभावी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये तसेच गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावा हा मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण द्यानपीठ वाणिज्य व कला महाविद्यालय उरण, पोलीस स्टेशन समोर उरण शहर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी १९२ रक्तदात्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी १८२ रक्तदाते स्वीकारण्यात आले. रक्तदानाविषयी जनजागृती करत आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला उरण तालुक्यातील नागरिकांचा, उत्तम प्रतिसाद लाभला आहे. उरण तालुक्यातील अनिरुद्ध उपासना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उरण मध्ये दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. अनिरुद्ध अकॅडमी डिझास्टर मॅनेजमेंटच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला सद्गुरु ब्लड बँक कोपरखैरणे महत्वाचे सहकार्य लाभले. सदर रक्तदान शिबीर उरण तालुक्यातील सर्व बापू भक्तांनी विशेष मेहनत घेतली.


