pub-7425537887339079
ब्रेकिंग

शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडीबीटी 2.0 पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

0 4 7 7 1 3
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.7

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील सर्व विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य/मुख्याध्यापक यांना याद्वारे सूचित करण्यात येते की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृती योजनांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडिबीटी 2.0 (MahaDBT २.०) या नवीन प्रणालीवर शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता सुरू करण्यात आलेली आहे.
शिष्यवृत्तीच्या लाभाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नीकृत (Aadhaar Seeded) बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याने, अचूक माहिती अर्जामध्ये भरावी. महाडीबीटी 2.0 पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी विद्यार्थी/पालकांना पुढील सूचना देण्यात आल्या आहेत.
यामध्ये महाआयडी (Maha (D) नव्याने तयार करणे सर्व विद्यार्थ्यांसाठी महाआयडी (Maha ID) नव्याने तयार करणे बंधनकारक आहे. मागील पोर्टलवरील युझर आयडी/पासवर्डची आता गरज नाही. आधार आधारित नोंदणी विद्यार्थ्यांनी आपला आधार क्रमांक वापरून नवीन महाआयडी बनवावा. आधार पोर्टलवर आपली सर्व माहिती (पत्ता, मोबाइल, ई-मेल आणि बैंक खाते) अचूक व अद्यावत ठेवावी. दस्तऐवज संकलनः आवश्यक सर्व कागदपत्रे (जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रके इ.) स्पष्ट PDF स्वरूपात अपलोड करावीत. नवीन व नूतनीकरण अर्ज: नवीन (Fresh) व नूतनीकरण (Renewal) अशा दोन्ही अर्जासाठी नवीन महाआयडी/आधार लॉगिन करणे आवश्यक आहे. नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी लॉगिन नंतर “माझा अर्ज नूतनीकरण करावा” ही विशिष्ट टॅब निवडावी. भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्जदारांकडून संबंधित महाविद्यालय शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस शिक्षण शुल्क घेत नसल्याने केंद्र हिस्सा विद्यार्थ्यांच्या खात्यावर प्राप्त होताच.
महाविद्यालयांसाठी आता केवळ एकच लॉगिन उपलब्ध असेल जे थेट महाविद्यालयाच्या प्राचार्याचे असेल (लिपिक लॉगिन पूर्णपणे बंद). ज्या महाविद्यालयांना अद्यापही लॉगिन पासवर्डबाबत काही अडचणी असतील तर त्यांनी त्यांच्या संबंधित शैक्षणिक विभागास संपर्क साधावा. प्रोफाइल व शुल्क निश्चितीः महाविद्यालयाने मागील युझर आयडी व नवीन डीफॉल्ट पासवर्डने लॉगिन करून आपली प्रोफाईल तपासून अभ्यासक्रमनिहाय निश्चिती करण्यात आलेले शुल्क (Fee Structure) तात्काळ अद्ययावत करावी. प्राचार्यांची जबाबदारी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित (Pending) ठेवू नयेत, अर्ज विहित मुदतीत मंजूर करून पुढे पाठविण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्राचार्यांची असेल.
महाडीबीटी पोर्टलकरिता https://mahadbt2.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस, उपरोक्त पोर्टलवरील लिंकवर लॉगिन या टॅबवर “नागरिकांसाठी लॉगिन” किंवा “महाआयडीशिवाय प्रवेश करा” या पर्यायाचा वापर करून आधार बेस लॉगिन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा पर्याय निवडा. त्यानंतर आधार संलग्न मोबाईल क्रमांक ओटीपी अद्यावत केल्यानंतरच लॉगिन होईल.
लॉगिन झाल्यानंतर पात्र योजनेचा तपशील अद्ययावत केल्यानंतर आपणास लागू होणाऱ्या विभागनिहाय 3 योजनांची यादी उपलब्ध होईल. आपणास ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा त्या योजनेच्या नावासमोर “पहा” क्लिक केले असता योजनेची सर्व माहिती दिसू शकेल.
त्यानंतर आपण निवड केलेल्या योजनेच्या समोर Apply टॅबवर क्लिक करून विद्यार्थ्यांनी (उदा. वैयक्तिक माहिती, चालू व मागील शैक्षणिक तपशील, योजनेसंबंधित आवश्यक कागदपत्रे) याप्रमाणे तपशील अद्ययावत करून अर्ज ऑनलाइन सबमीट करावा व प्रिंट किंवा पीडीएफमध्ये जतन करून ठेवावा.
आवश्यक ती सर्व माहिती उदा. जात, प्रवर्ग, महाराष्ट्राचे रहिवासी, दिव्यांगत्व, कौटुंबिक उत्पन्न इ. पोर्टलमध्ये काळजीपूर्वक भरावी. अधिक माहितीकरिता 022-49150800/18001025311 अथवा helpdesk@mahadbt.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करावा. तांत्रिक अथवा प्रशासकीय तक्रारीकरिता आपल्या लॉगीनमधून स्क्रीनशॉटसह तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
महाविद्यालयांनी महाडीबीटी 2.0 पोर्टलवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे व अर्ज करण्यासाठी सहकार्य करावे. अनुसूचित जातीच्या कोणत्याही पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्काची रक्कम घेवू नये, आपल्या महाविद्यालयाचे नाव, महाविद्यालयास मान्य असलेल्या अभ्यासक्रमाची नावे, अभ्यासक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता, महाविद्यालयाच्या व अभ्यासक्रमाच्या मान्यतेचे विविध आदेश, शुल्क रचना इ. माहिती पोर्टलवर मॅप करण्यासाठी संबंधित शैक्षणिक यंत्रणा (उदा. संचालनालयास/विद्यापीठास/परिषदेस/FRA) यांचेकडून मॅप करून घेण्याची कार्यवाही करावी. अशी माहिती सहायक आयुक्त समजाकल्याण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 7 1 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे