pub-7425537887339079
ब्रेकिंग

जालना पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पोलिसांना बांधल्या राख्या; तालुका पोलीस ठाण्यात रक्षाबंधन उत्साहात संपन्न!

0 4 8 3 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.29

जालना पब्लिक स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आज जालना तालुका पोलीस ठाण्याला भेट देऊन कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस काकांना राख्या बांधल्या. शाळेच्या प्राचार्या श्रीमती कीर्ती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या आगळ्यावेगळ्या आणि कौतुकास्पद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिवसरात्र जनतेच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विशेष भेटीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या शिक्षिका श्रीमती नेहा राठोड, दिपाली हजारे व इतर शिक्षक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थी पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्व मुलांचे अतिशय उत्साहात स्वागत केले.
विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदाने पोलीस बांधवांच्या मनगटावर राखी बांधून, त्यांना पेढा भरवला व त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. आपल्या कुटुंबापासून दूर राहून सण-उत्सवाच्या काळातही ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हा क्षण अत्यंत भावूक करणारा ठरला. पोलिसांनीही या चिमुकल्यांना खाऊ आणि भेटवस्तू देऊन त्यांचे तोंड गोड केले, तसेच त्यांना नेहमी सुरक्षित राहण्याचा आणि चांगला अभ्यास करण्याचा सल्ला दिला.
याप्रसंगी पोलिसांनी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते, याबद्दल सोप्या भाषेत माहिती दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील पोलिसांबद्दलची भीती दूर होऊन एक मैत्रीचे नाते निर्माण होण्यास मदत झाली. शाळेच्या शिक्षकांनी, समाजाचे रक्षण करणाऱ्या या खऱ्या हिरोंना सन्मान देणे हे आमचे कर्तव्य असल्याचे सांगत पोलिसांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे