राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या जालना जिल्हा अध्यक्ष पदी केशव पाटील जंजाळ यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा जाफ्राबाद येथे स्वागत सत्कार
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.23
जिल्हा अध्यक्ष केशव पाटील यांनी दि. 28 नोव्हेंबर रोजी जालना येथे बेरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे याची माहिती दिली. या मेळाव्यात पुणे,व छत्रपती संभाजी नगर येथील उद्योजक, कंपनीचे प्रतिनिधी येणार आहे व त्या ठिकाणी बेरोजगार युवकांची निवड केली जाणार आहे. म्हणून या मेळाव्यात जास्तीत जास्त युवकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे सांगितले
तसेच जालना जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विकास कामाच्या माध्यमातून अधिक मजबूत करण्याचा संकल्प त्यांनी केला. व राज्याच्या उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रा वाहिनी अजितदादा पवार यांच्याकडे जिल्हातील विकास कामे, शासनाच्या योजनाचा पुरेपूर लाभ लवकर कसा मिळेल यासाठी पाठपुरावा करणार.असे सांगितले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष दत्तू पाटील आंभुरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष माजी नगरसेवक फारुख कुरेशी,नगरपंचायत उपाध्यक्ष शेख राऊफ चेरमन, नगरसेवक शेख मुश्ताक, नगरसेवक विजू गोफणे,तालुका उपाध्यक्ष बाळकृष्ण हिवाळे, तालुका कार्याध्यक्ष ऍड सचिन सोरमारे, शहर अध्यक्ष ऍड विनोद डिगे, महिला शहर अध्यक्ष ऍड नीता हिवाळे, युवक तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गाढे, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष शेख नासेर,अल्पसंख्यांक तालुका कार्याध्यक्ष शेख मुजफ्फार,शहर अध्यक्ष मोहसीन टेलर, कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष शेख शब्बीर, शहर अध्यक्ष शेख अजिज, विध्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष विनोद कोरडे, आदी व कार्यकर्ते उपस्थित होते.




