pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी गावाची अवस्था, नेते कार्यकर्ते,गावकरी, आपण टेंभुर्णीचे आहोत हे विसरायला लागले — जनार्दन झोरे.

0 4 6 1 8 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.15

टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना हे गाव जाफराबाद तालुक्यात सर्वात मोठे गाव आहे. या गावचा इतिहास निजाम काळापासून एक ऐतिहासिक गाव म्हणून नाव लौकिक आहे. गावाचा ऐतिहासिक ठेवा असा आहे की या गावांमध्ये बारा मारुती (जुने गाव ), बारा महादेवाची मंदिरे, बारा मारुती आणि बारा महादेवाची मंदिरे एकाच मंदिरात स्थापन आहे. दोन मोठ्या वेळेस आहे. दोन्ही वेशीबाहेर दोन बारवा आहे. अशा या ऐतिहासिक गावामध्ये पूर्वीपासूनच एकोप्याने राहणारी लोक आहे. पाच पोरांची टेंभुर्णी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंभुर्णी चा नावलौकिक आहे. टेंभुर्णी ला ग्रामपंचायत निर्माण झाल्यानंतर येथे ग्रामपंचायतीचा कारभार अतिशय वातावरणात आणि गावाला धरून चालणारा होता. हळूहळू गाव मोठे होत गेले आणि ग्रामपंचायत चा कारभारी मोठा होत गेला. हळूहळू या ग्रामपंचायत मध्ये राजकारण सुरू झाले. असा जसा ग्रामपंचायतला निधी वाढत गेला तसा तसा राजकीय ठेवा ही वाढत गेला. गावातील सामाजिक कार्यकर्ते नेते व राजकीय पक्ष यामध्ये उतरले. हळूहळू गावचा कारभार सुंदर प्रीतीने चालत असतानाच अचानक वेगळ्या पद्धतीने गावचा कारभार करण्याची सुरुवात झाली. अशा या गावाच्या कारभारामध्ये अचानक बाह्य शक्तीचा वापर होऊ लागला. आणि बाह्य शक्ती हळूहळू पणे गावातील नेत्यांवर, गावातील नेत्यांच्या कार्यकर्त्यांवर प्रभाव पाडायला सुरुवात झाली. आणि गावातील कारभारी त्या प्रभावाखाली आले आणि स्वतःच्या अस्तित्व विसरून गेले. __________________ चौकट :- गावातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सोरे यांनी आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, गावातील ग्रामपंचायत मध्ये ग्रामविकास विभागाचा तसेच विविध विभागाचा फंड अस्तित्वात आला तेव्हापासून गावकऱ्यांच्या राजकारणात फरक पडला, त्या फंडाचा व्हिडिओ कसा करायचा याची स्पर्धा नेत्यांमध्ये लागली. दोन ते तीन टर्म पासून ग्रामपंचायत मध्ये स्पर्धा सुरू झाली. खरं पाहिलं तर ग्रामपंचायत मध्ये राजकीय पक्ष अस्तित्वात नसतो. गावातीलच कारभारीन ते निवडून देत असतात. परंतु एका गटाचे जास्त कार्यकर्ते निवडून आल्यानंतर ते दुसऱ्या गटात कसे जातील ही स्पर्धा त्या टेंभुर्णी नगरांमध्ये पाहायला मिळाले. एक गट स्पष्टपणे बहुमत असताना अचानक बदल होऊन दुसऱ्या गटाकडे सत्ता स्पर्धा जाते आणि तिथेच ग्रामपंचायतचा कारभार गावचा कारभार हा वेगळ्या पद्धतीने चालायला सुरुवात झाली आणि गावचा विकास फक्त कागदावरच राहिला. बाह्य शक्तीपासून कारभार करण्याचा जेव्हा फंडा निर्माण झाला तेव्हा मात्र गावातील नेते कार्यकर्ते आणि गावकरी हे स्वतःची ओळख आपण टेंभुर्णीचे आहोत हे विसरायला लागले. आणि ज्यावेळेस चौका चौकात गावावर विविध मंदिरांच्या पारावर ज्यावेळेस हे नेतेमंडळी चर्चा करतात तेव्हा आपल्या पण काय होते हे त्यांच्याकडून करून घ्यावे लागते. असे म्हणू लागले आणि ज्यावेळेस असे म्हणले जाते त्यावेळेस आपली स्वतःची ओळख विसरल्या जाते आपण या गावचे आहोत हेही विसरल्या जातं आणि आपण काय आहोत हे विसरला जातो. हीच अवस्था टेंभुर्णी तल्या प्रत्येकाची झालेली आहे. टेंभुर्णीच्या मतदारांनाही महत्व नाही टेंभुर्णीच्या नागरिकांनाही महत्व नाही टेंभुर्णीच्या नेत्यांनाही महत्व नाही. आम्ही फक्त मोठे आहोत या संकल्पनेत राहिल्यामुळे टेंभुर्णी गावचा विकास खुंटलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते जनार्दन झोरे —————————- चौकट:- युवा नेते व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांमध्ये मिसळणारे कार्यकर्ते शेख युसूफ सौदागर यांनी आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की मी सतत टेंभुर्णीच्या वरच्या बस स्टैंड वर चक्कर मारत असताना असे दिसते की, टेंभुर्णी गावचा बस स्टँड आहे का फाटा आहे हे समजत नाही. विविध समस्यांनी ग्रस्त अशा या बस स्थानकाला वाली नाही. असतानाच्या शेजारीच पशुसंवर्धनाचा दवाखाना जुना तिथे तर मोकळ्या अवस्थेतील शौचालय झालेले आहे हे दिसते. टेंभुर्णीच्या गेस्ट हाऊस कडून येणारा रस्ता कधी वाकडा झाला हे कळालेच नाही. येणारा रस्ता वाकडा केल्या गेला आणि तिथे अतिक्रमाला चालना मिळाली हे नेमकं कोणी केलं हे कळायला मार्ग नाही. ग्रामपंचायतचे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून कोणत्या प्रकारची मदत किंवा मार्गदर्शन मिळत नाही. विविध समस्या गावात आहे त्या समस्या सुधारणा झाली नाही तर युवकांमार्फत मोठ आंदोलन उभारण्याची तयारी आहे असेही त्यांनी आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. युवा नेते शेख युसुफ सौदागर ==============. टेंभुर्णी च्या समस्या म्हणजेच, टेंभुर्णीचे वरचे बस स्टँड ते खालचे बस स्टॅन्ड पर्यंत रस्ता खराब झालेला आहे. टेंभुर्णीच्या गावात बस स्थानक असूनही बस गावात येत नाही. टेंभुर्णीचे बस स्थानक वर नेण्यासाठी टेंभुर्णीच्याच नेत्यांनी प्रयत्न केल्याचे बोलल्या जाते. टेंभुर्णी गावात नाल्यांचा खर्च झालेला आहे. परंतु नाल्यातून पाणीच वाहत नाही. गावातील नळ आल्यानंतर सर्व रस्त्यांवरच पाणी असते. गावची रचना इतकी सुंदर आहे की प्रत्येक गल्ली प्रत्येक रस्ता हा गावच्या बाहेर निघतो. सर्वच रस्त्याचे सिमेंटीकरण झालेले नाही. गावामध्ये स्ट्रीट लाईट आहे त्यावर ग्रामपंचायत कडून दिवाळीला व यात्रेच्या वेळेस लाईट लावल्या जातात. परंतु मागील वर्षी दिवाळीला लाईट लावलेले नाही आणि यात्रेला ही लाईट लावलेले नाही. टेंभुर्णी गावची लाईन कधीही न जाणारी होती परंतु आता कधीही लाईन जाते. कोणताच नेता गावातील त्या लाईन बद्दल बोलत नाही. कारण लाईन चा कॉन्ट्रॅक्ट कोणाला तरी दुसऱ्याला दिलेला आहे त्यामुळे ते चूप आहेत का असा प्रश्न गावकरी विचारत आहे. त्याचा कॉन्टॅक्ट ज्याला दिलेला आहे त्याच्या दबावाखाली आहेत का ते नेते याचाही प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. गावच्या अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी गावातील कोणतेही नेते एकत्र येत नाहीत ही दिशादर्शक समस्या आहे. आणि म्हणूनच म्हणावसं वाटतं आता गावातील नेते कार्यकर्ते गावकरी टेंभुर्णीचे आहेत ही ओळख विसरायला लागलेले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 1 8 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे