बौद्धाचार्य श्रामनेर शिबिर

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.30
तक्षशिला बुद्ध विहार समर्थ नगर येथे 29 मे पासून ७ जून २०२६पर्यंत तक्षशिला बुद्ध विहारामध्ये भारतीय बौद्ध महासभेतर्फे भव्य श्रामनेर शिबिराचे आयोजन केलेले आहे.शिबिरामध्ये एकूण ३० श्रामनेर यांनी श्रामनेर म्हणून १० दिवसासाठी दीक्षा घेतली आहे. या शिबिरामध्ये श्रामनेरांना धम्माची शिकवण, त्रिशरण पंचशील, बुद्ध धम्म संघ संस्कारमय शिकवण दिली जाणार आहे. थेरो भदंत शिवली मुख्य मार्गदर्शक तर रवींद्र दारोकार (अमरावती) , तक्षशिला बुद्धविहाराचे अध्यक्ष भिकाजी साळवे तसेच अशोक गंगावणे, चंद्रकांत वाघमारे, बगळे सर , संभाजी कांबळे, चंद्रकांत वाघमारे डॉ.सुशील सूर्यवंशी ( रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ) डॉ . राजकुमार म्हस्के,संदीपभाऊ खरात, नगरसेविका रीमाताई खरात यांचे विशेष मार्गदर्शन लाभले . यावेळी महिला जिल्हाध्यक्ष आशा कोळी, राजेश सदावर्ते भारतीय बौद्ध महासभा ( जिल्हाध्यक्ष जालना), माधवराव पात्रे( सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा), अरुण वाघमारे (कोषाध्यक्ष) कुणाल दहिवले( उपाध्यक्ष) , उपाध्यक्ष सुभाष म्हस्के, प्रकाश राऊत, समाधान खरात सचिव संरक्षण, गणपत भद्रे पर्यटन सचिव, शेषराव सोनवणे संघटक कुलदीप गरड सचिव,उपस्थित होते. यावेळी सर्व उपासक व उपासिका धम्मदानासाठी उपस्थित होते.




