
0
4
8
0
1
1
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17
साई ट्रस्ट च्या जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात स्वतंत्र भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रभक्तीने साजरा करण्यात आला.शाळेच्या बालोद्यान, प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील २१०० विद्यार्थी व त्यांचे पालक,शाळेच्या सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अथक
परिश्रमामुळे हे अभूतपुर्व यश प्राप्त झाले आहे. या यशात संस्थेचे अध्यक्ष व शाळेचे चेअरमन नरसू पाटील, मुख्याध्यापक रमाकांत गावंड, श्रीम.वैशाली बोरचटे, गिरीश पाटील, भुषण जाधव, अंकुश जोगळे यांच्या दूरदर्शी नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे कलाशिक्षक मिलिंद ठाकूर यांनी उत्तमप्रकारे केले. शाळेचे संगीत शिक्षक पंडित गणेश बंडा, श्रीम. स्वप्नजा म्हात्रे, श्रीम. भारती कांबळे आणि विद्यार्थी संचाने
राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, आणि देशभक्तीपर गीते सुमधुर स्वरांनी सादर केली.वर्गशिक्षिका श्रीम.वंदना कपूर,श्रीम.प्रिती कडू यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.किशोर म्हात्रे यांनी सुंदर फलक लेखन केले होते. श्रीम.आश्रया शिवकर,श्रीम.योगसाधना पाटील,श्रीम.उज्ज्वला तांडेल,श्रीम.कीर्ती शिरसाट यांनी उत्तम सजावट केली.तसेच मान्यवरांच्या स्वागताच्या प्रसंगी खूप मेहनत घेतली. शाळेचे आदर्श क्रीडाशिक्षक मनोहर टेमकर यांनी ध्वजारोहण संचलन आणि कवायत संचलन उत्तमप्रकारे सादर केले.शाळेच्या परंपरेनुसार प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानाने निमंत्रित केलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उरण तालुक्यात प्रथम आणि रायगड जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत झळकलेल्या गुणवंत आणि कीर्तीवंत विद्यार्थी कु. नमित वाघावले, कु. आयुष पाटील, कुमारी-हंसिका बंडा, कु. आदर्श डिगे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या राष्ट्रीय सोहळ्यासाठी पालक संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष योगेश तांडेल, माजी विद्यार्थी संघटनेचे
कार्याध्यक्ष प्रतिक भोईर, शिक्षक नेते आर. के. म्हात्रे, ज्येष्ठ शिक्षिका श्रीम. भारती कांबळे, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी श्रीम. माधुरी कडू, शाळेच्या पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आणि तमाम पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील , शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक नेते रमाकांत गावंड आणि प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तुरुंगवास भोगलेल्या, आपल्या प्राणाचे बलिदान देणारे महान देशभक्त, नेते, क्रांतिकारक यांनी देशासाठी केलेल्या त्यागाचे, कार्याचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. तसेच देशाच्या विज्ञान, तंत्रज्ञान,लोकशाही आणि आर्थिक विकास अशा सर्वागीण विकासाबाबत आणि शाळेच्या शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील गौरवशाली पंरपरेबाबत
आपले विचार मांडले.या कार्यक्रमांतर्गत देशभक्तीपर गीते आणि घोषणा देत जे. एन. पी. ए. वसाहतीत भव्य-दिव्य प्रभातफेरी काढून भारतीय स्वातंत्र्याचा जयजयकार केला. विविध स्पर्धा घेण्यात आल्या. ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्ती व राष्ट्र प्रेमाची प्रेरणा देणारे
भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.त्याचबरोबरच एक पेड मा के नाम या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा व कलाक्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर गरुड भरारी घ्यावी म्हणून साई ट्रस्ट क्रीडा अकॅडमीची स्थापना या शुभदिनी करण्यात आली. देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्ताने जे. एन. पी. ए. प्रशासनातर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
4
8
0
1
1




