pub-7425537887339079
ब्रेकिंग

अखिला मेमोरियल ट्रस्टच्या वतीने रानसई मार्गाचीवाडी व सागाचीवाडीवरील आदिवासी बांधवांना दिवाळी निमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.

0 5 0 9 7 5
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3
प्रत्येक माणसाच्या जीवनात जसा आनंद हा काही काळापुरता  क्षणभंगूर वेळेचा सोबती असतो तसंच दुःख सुद्धा  चिरकाल टिकणारं नसतं. फक्त त्या दुःखावर मात करत त्यातून सुद्धा आनंद कसा शोधता येईल याची कला अवगत असणं खूप महत्वाचं आहे. अश्याच एका हृदयपिळवटून टाकणाऱ्या घटनेत अगदी लहान वयातच कॅन्सर सारख्या आजारात आपली लाडकी मुलगी अखिला हिला  गमावलेल्या,आपला काळजाचा तुकडा हरपलेल्या त्या संपूर्ण बाळा सुब्रमण्यम आणि कलावतीजी सुब्रमण्यम यांच्या  कुटुंबावर दुःखाचं आभाळ कोसळलं  पण त्या दुःखाला कुरवाळत न बसता त्यातून सावरत आपल्या लाडक्या मुलीच्या  अखिलादीदीच्या पवित्र स्मृतीतुन आठवणींचा सुगंध सामाजिक कार्याच्या माध्यमातून सदैव दरवळत राहावा म्हणून बाळा सुब्रमण्यम  आणि कलावतीजी सुब्रमण्यम या उभयतांनी अखिला मेमोरियल ट्रस्ट या  सेवाभावी संस्थेची स्थापना करून समाजातील गरीब  गरजूवंत कॅन्सर पिडीत रूग्णांना मदतीचा हात पुढे करत त्यांची सेवाकरण्याचं पुण्यकर्माचं कार्य सुरू ठेवलं.त्याचसोबत समाजातील गरीब – गरजूवंत,आदिवासीं वाड्यांवस्तीवरील आदिवास बांधवांना अन्नधान्य कपडे, शालेय साहित्य,औषधं अश्या विविध प्रकारचे सामानरूपी मदत देऊन हे अनमोल असं सत्कार्य अविरतपणे सुरू ठेवत याच पुण्यकर्मातून आपल्या लाडक्या  मुलीच अखिलादीदीच पुण्यस्मरण व्हावं ! आणि स्वर्गीय अखिलादीदी यांच्या  स्मृतींना उजाळा मिळावा म्हणून त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या अखिला मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक बाळासुब्रमण्यम, आणि कलावतीजी सुब्रमण्यम या उभयतांच्या औदार्यातून आणि केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक  राजू मुंबईकर,संपेशजी पाटील यांच्या विशेष अश्या सहकार्यरूपी पुढाकारातून उरण तालुक्यातील रानसई मार्गाचीवाडी आणि सागाचीवाडी या दोन आदिवासी वाड्यांवरील गरीब गरजूवंत आदिवासी बांधवांची दिवाळी गोड व्हावी म्हणून अगदी  चांगल्या दर्जाचे रवा,मैदा, साखर,गोडेतेल,बेसन अश्या प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटत करण्यात आलं. सोबतच दिवाळी सणात दीपोत्सव साजरा करण्यासाठी सुंदर सुबक प्रकारच्या  पणत्या देखील वाटप करण्यात आल्या.
    स्वर्गीय कुमारी आखिलादीदी यांचे आई – बाबा बाळा सुब्रमण्यम,आणि कलावतीजी सुब्रमण्यम यांच्या कुटुंबियांच्या  औदार्यातून आणि राजू मुंबईकर आणि संपेश पाटील  यांच्या सहकार्यानं साकार झालेल्या ह्या आदर्शवत कार्यक्रमात आखिला मेमोरियल ट्रस्ट  या संस्थेच्या वतीने ह्या आदिवासी बांधवांना दिवाळी भेट म्हणुन मिळालेलं जीवनावश्यक सामान व स्वत:च्या हाताने रंगकाम केलेल्या सुंदर पणत्या मिळाल्या वर त्या  आदिवासीं भगिनींच्या आणि चिमुकल्या आदिवासी  रानपाखरांच्या चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा आनंद पाहण्या जोगा होता. ह्या आदिवासी बांधवांना  दिवाळीच्या पूर्व संधेला मिळालेलं हे दिवाळी गोड करणारं साखर, रवा,मैदा, गोडेतेल,बेसन हे  जीवनावश्यक वस्तूंचे समान आणि दीपोत्सव साजरा करण्यासाठी  मिळालेल्या सुंदर सुबक पणत्या हे सर्व घेत असताना भावभरल्या मनाने  दिलेले आशीर्वाद नक्कीच स्वर्गीय आखिला दीदीच्या संपूर्ण  कुटुंबियांकरिता पुण्यफळ देणारं ठरेल आणि स्व.अखिला दीदीच्या  स्मृतीनां निरंतर उजाळा देत राहील एवढ मात्र नक्की !
    स्व.अखिलादीदी यांच्या पुण्यस्मरण दिनी  अखिला मेमोरियल ट्रस्ट च्या  माध्यामातून साकारलेल्या ह्या प्रेरणादायी कार्यक्रमा करीता प्रमुख उपस्थिती दर्शविली ती अखिला मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बाळा सुब्रमण्यम,कलावतीजी सुब्रमण्यम, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर,रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका तसेच मुंबई शहरात सुद्धा  आपल्या समाज कार्याचं सामाजिक दायित्व  जपणारे  सामाजिक कार्यकर्ते नारायणजी माने ( सचिव – कुरचुंब विकास मंडळ मुंबई ),रानसई ग्रामपंचायतीच्या सरपंच राधाताई पारधी, केळवणे गावचे सामाजिक कार्यकर्ते विलासभाऊ ठाकूर, वेश्वी गावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्रदादा पाटील,अनिल घरत ( लायन ग्रुप महाराष्ट्र सोशल मि.रायगड जिल्हा अध्यक्ष ), सारडे गावचे सामाजिक संपेशजी पाटील,रानसई खोंड्याचीवाडीचे सामाजिक कार्यकर्ते शाम लेंडे सोबतच रानसई मार्गाचीवाडी आणि  सागाचीवाडी या दोन आदिवासी  वाड्यांवरील आदिवासीं बांधव व महीलां-भगिनीं आणि  चिमुकल्यांच्या उपस्थित रानसई प्राथमिक शाळे जवळील भव्य अशा समाजहॉल मध्ये हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भावभरल्या वातावरणात संपन्न झाला.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 0 9 7 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे