pub-7425537887339079
ब्रेकिंग

बौद्ध पौर्णिमेनिमित्त तक्षशिला बुद्ध विहारात विविध कार्यक्रमांचे आयोजन!

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.2

समर्थ नगर, येथील तक्षशिला बहुउद्देशीय संस्था संचलित तक्षशिला बुद्ध विहारात बौद्ध पौर्णिमेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पंचरंगी ध्वजाच्या ध्वजारोहणाने झाली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जालना महानगरपालिकेच्या नगरसेविका ॲड. रीमाताई खरात, पँथर रिपब्लिकनचे संदीप खरात, तक्षशिला बुद्ध विहाराचे अध्यक्ष भिकाजी साळवे, अशोक गंगावणे व चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर उपस्थित उपासक-उपासिकांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण केले. यानंतर प्रमुख अतिथी ॲड. रीमाताई खरात यांनी तथागत गौतम बुद्धांच्या कार्याची व विचारांची महती विशद केली. तसेच या पवित्र दिवशी संदीप खरात यांना पुत्ररत्न प्राप्त झाल्याच्या आनंदानिमित्त सर्व उपस्थितांना भोजनदान संदीप खरात यांच्याकडून देण्यात आले. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या संगीत रजनी कार्यक्रमात गायिका संबोधी इंगोले यांनी ‘ प्रथम नमो गौतमा’ हे गीत सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्याचप्रमाणे अर्चना कांबळे व मीनाताई शरणागत यांनीही बुद्धगीते सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. कार्यक्रमाला प्रा. किशोर साळवे, राजेश बगळे, प्रा. संभाजी कांबळे, राहुल खरात, ज्योती मगरे, महेश शिंदे, कुलदीप गरड, विशाल वाघमारे, अजय ढवळे, प्रशिक खंडारे, प्रणाली खंडारे, शुभम गायकवाड, सुप्रिया बगळे, पगारे मॅडम, शालिनी इंगोले, तेजस्विनी दाभाडे यांच्यासह अनेक मान्यवर व उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप इंगोले यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे