माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21
१९ जून रोजी माजी आमदार विवेक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुका शेतकरी कामगार पक्षाची वतीने उरण तालुका चिटणीस रवी घरत यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरकोन येथील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य चे वाटप करण्यात आले.अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे खरे गमक आहे हे वाक्य सर्वांनाच माहित आहे समाजातील खेड्यापाड्यातील वाडी वस्तीवरील विद्यार्थी शिकला पाहिजे, आणि तो टिकला पाहिजे ही माजी आमदार विवेकानंद पाटील यांची पहिल्यापासूनची इच्छा होती. घरोघरी ज्ञानाची गंगा पोचली पाहिजे यासाठी अहोरात्र मेहनत करणारे माजी आमदार विवेक पाटील यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त पिरकोन गावातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य आणि खाऊवाटप हा कार्यक्रम करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी उरण पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे,उरण तालुका शेकाप चे चिटणीस रवी घरत, पंचायत समिती सदस्य प्रारंभी गावंड , सारडे गावचे माजी सरपंच चंद्रशेखर पाटील, पिरकोन गावचे ग्रामपंचायत सदस्य निखिल गावंड, इंग्लिश मीडियम स्कुलचे चेअरमन अनंत गावंड, माजी सरपंच रमाकांत जोशी, हरेन्द्र गावंड, माजी सदस्य सुरेंद्र गावंड, सामाजिक कार्यकर्ते नामदेव गावंड , लाल ब्रिगेड चे अध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे, महिला आघाडी अध्यक्ष समता गावंड, बेबी गावंड,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रेशमा गावंड,श्रद्धा पाटील, शाळेतील सर्व शिक्षक आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलिमा म्हात्रे यांनी करून सर्व मान्यवरांचे स्वागत केले.तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप केल्याबद्दल सर्वांच्या वतीने आभार मानले.



