pub-7425537887339079
ब्रेकिंग

रोहिणी बरसाल्या, टेंभुर्णी परिसरामध्ये शेतीच्या कामांना व लागवडीला वेग आला

0 4 4 2 0 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8

पावसाच्या पहिल्या शिडकाव्यानंतर टेंभुर्णी व अकोला देव पापळ परिसरात शेतीच्या कामांना वेग; खते, बियाणांच्या वाढत्या भावाबद्दल शेतकऱ्यांची खंत रोहिणी नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावताच टेंभुर्णी आणि अकोला देव पापळ शिवारात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. उन्हाने तापलेल्या जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी बैलजोड्या जुंपून नांगरणीची कामे सुरू केली आहेत. मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि मुलीचे लग्न यांसारख्या जबाबदाऱ्या पिकावरच अवलंबून असल्याचे ५० वर्षीय शेतकरी फकीरबा एकनाथ सोनसाळे यांनी सांगितले. खते, बियाणे आणि औषधांचे भाव गगनाला भिडले असताना, शासनाकडून शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून महिला वर्गानेही शेतीच्या कामांना सुरुवात शेतातील काडीकचरा वेचणे आणि बीजप्रक्रियेवर त्यांचा भर आहे. घरची कामे आवरून शेत हेच आमचे देवघर, या भावनेतून महिला काम करत असल्याचे सीमा यांनी सांगितले. मूग, उडीद आणि बाजरी पेरणीसाठी चौकट :- अन्नदात्याची आठवण ठेवा शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवावी. ग्राहकांनी शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करताना याची जाणीव ठेवावी की शेतकऱ्यांनी कष्टाने ते पिकवलेले असते. शेतकऱ्यांनी खते आणि बियाण्यांची जुळवाजुळव अंतिम टप्प्यात आहे. यंदा पाऊस चांगला पडून पिकांना योग्य भाव मिळावा, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान, शहरी भागातील नागरिकांनी शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून भाजीपाला खरेदी करताना योग्य मोबदला द्यावा, असे आवाहन संतोष आवटी यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 2 0 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे