pub-7425537887339079
ब्रेकिंग

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू!

कंपनी प्रशासनाकडून मागण्या अमान्य; आंदोलन सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा निर्णय स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना संधी देण्याची मागणी; अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

0 4 9 7 6 9
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि 29
उरण तालुक्यातील खोपटे येथील मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार व व्यवसायाच्या संधींमध्ये सामावून घ्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून गेट बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकरी व कंपनी प्रशासन यांच्यात दि २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता कंपनी मध्ये महत्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे,शिवसेना नेते बी एन डाकी, भाजपा युवा नेते प्रशांत ठाकूर,पंचायत समिती सदस्य कविता रुपेश पाटील,कामगार नेते रवि घरत,विविध उपस्थित मान्यवर,मोठेखार (वरचा भाग )प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना खोपटे बांधपाडाचे पदाधिकारी यांनी बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बाजू आक्रमकपणे मांडली. स्थानिक बेरोजगार शेतकऱ्यांना न्याय मिळाले पाहिजे. १९ बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कामावर त्वरित रुजू करून घ्यावे अशी मागणी केली. यावेळी मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीचे अधिकारी तसेच ठेकेदार उपस्थित होते.कंपनी प्रशासनाने सध्या १० माणसे कामावर घेऊ व नंतर ३ महिन्यांनी ९ माणसे कामावर घेऊ असे वचन दिले. मात्र हा निर्णय बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मान्य नसल्याने त्यांच्यातर्फे उपस्थित शिष्ट मंडळाने सर्वच्या सर्व १९ जणांना एकदाच एकाच वेळी कामावर घ्या. टप्प्या टप्प्या ने नको एकदाच सर्व १९ बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कामावर घ्या अशी आक्रमक भूमिका घेतली. मात्र कंपनी प्रशासनाने  ही बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मागणी अमान्य केली.त्यामुळे आक्रमक होत बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी व आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे व पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, सर्वच पक्षाचे कार्यकर्ते यांनी मुजोर मनमानी करणाऱ्या कंपनी प्रशासनाचा व बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नोकर भरतीला विरोध करणाऱ्या ठेकेदारांचा निषेध व्यक्त करत कंपनीच्या गेट समोरच बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
दि २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता मिटिंग मध्ये अनेक विषयावर सविस्तर चर्चा झाली. मात्र चर्चा निष्फळ झाल्याचे समजताच बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी व सर्वच राजकीय पक्षाच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी कंपनी प्रशासनाकडून मागण्या मान्य करण्यात न आल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.
मोठेखार (वरचा भाग) प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना, खोपटे-बांधपाडा यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
मेहर यार्ड कंपनीत पेण, अलिबाग, पनवेल तालुक्यातील ७० हुन अधिक माणसे काम करीत आहे. मात्र  ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या कंपनीसाठी संपादित झाल्या त्यांना मात्र कंपनी कामावर घेत नाही. त्यांना नोकरीत रुजू करून घेत नाही. स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरीत प्राधान्य देण्या ऐवजी परप्रांतीय व्यक्तींची भरती सुरु आहे. उरण तालुक्याबाहेरील व्यक्ती कंपनीत मोठया प्रमाणात काम करत आहेत. त्यामुळे स्थानिक बेरोजगार तरुणांवर, स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर, त्यांच्या कुटुंबियांवर खूप मोठा अन्याय होत आहे. हा अन्याय आम्ही कोणीही सहन करणार नाही. आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी ठाम व आक्रमक भूमिका शिवसेना नेते बी एन डाकी यांनी मांडली.
कंपनीच्या विविध प्रकल्पांमध्ये स्थानिक कामगारांना प्राधान्य देण्यात यावे. लोकल लेबर, सर्व्हेअर, हाऊसकीपिंग तसेच इतर कामांसाठी स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. परिसरातील तरुणांना रोजगारासाठी बाहेर भटकंती करावी लागत असताना स्थानिक भागातील कंपन्यांमध्ये त्यांना प्राधान्य मिळावे, अशी भूमिका आंदोलनाचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी मांडली. जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सदर आंदोलन असेच सुरु राहील. मुजोर कंपनी प्रशासनाला व मुजोर ठेकेदारांना धडा शिकविल्याशिवाय गप्प बसणार नाही. शासनाचा निर्णय (GR )असताना सुद्धा शासन निर्णय (GR )चे मुजोर कंपनी व मुजोर ठेकेदारांनी उल्लंघन केले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. स्थानिक प्रकल्पग्रस्त्त बेरोजगार शेतकऱ्यांना न्याय मिळालेच पाहिजे अशी भूमिका आपल्या भाषणातून अजित म्हात्रे यांनी मांडली.
कंपनीमध्ये उपलब्ध होणाऱ्या रोजगार आणि व्यवसायाच्या संधींमध्ये ७/१२ धारक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य स्थान देण्यात यावे. प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शेतकरी कुटुंबांना रोजगार आणि व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळावे, अशी आंदोलकांची अपेक्षा आहे.ही मागणी रास्त असून बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. त्यांना नोकरीत सामावून घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करून कंपनी प्रशासनावर कडक कायदेशीर कारवाई करू असे सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील यांनी मत व्यक्त केले.
संबंधित मागण्यांसंदर्भात आंदोलनाच्या पहिल्या दिवशी कंपनी प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्याने आंदोलकांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. स्थानिक बेरोजगार आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, प्रशासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
यावेळी आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी,भाजपा युवा नेते प्रशांत ठाकूर, शिवसेना नेते बी एन डाकी,पंचायत समिती सदस्य दिपक भोईर, पंचायत समिती सदस्य कविता रुपेश पाटील,कामगार नेते रवि घरत, मनसेचे तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, सभापती राजेंद्र म्हात्रे, पोलीस पाटील रंगनाथ पाटील, माजी सरपंच विशाखा ठाकूर, माजी सरपंच प्रीती पाटील, माजी सदस्य अविनाश ठाकूर, भाजपा नेते किरण म्हात्रे ,माजी सदस्य विश्वास पाटील, उद्योजक देवेंद्र पाटील, पाणी कमिटीचे कुमार ठाकूर,मनसेचे विभाग अध्यक्ष बबन ठाकूर, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटील उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 7 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे