टेंभुर्णीत मृग नक्षत्र कोरडा पावसाचा थेंब नाही;
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.22
मृग नक्षत्राला ९ जूनपासून सुरुवात होऊनही तोच संपला तरीही टेंभुर्णी परिसरात पाणी पडला नाही त्यामुळे टेंभुर्णीसह जाफ्राबाद तालुक्यात अद्याप पावसाचा एकही थेंब पडलेला नाही. पावसाअभावी परिसरातील ९० टक्के पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. आषाढी एकादशी तोंडावर आली असताना शेतात बी पडले नसल्याने बळीराजाने आता विठ्ठलाकडे पावसासाठी आर्त हाक दिली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेली शेते सध्या ओसाड आणि तडे गेलेल्या अवस्थेत आहेत. शेतकऱ्यांनी कर्ज काढून आणलेले बियाणे आणि खते पडून आहेत. काही धाडसी शेतकऱ्यांनी सोशल मीडियावरील हवामानाच्या अंदाजांवर विश्वास ठेवून घाईघाईने कपाशीची धूळपेरणी —————————————————————–
अंदाज फसला, शेतकरी संकटात “सोशल मीडियावरील तथाकथित हवामान अंदाजांवर विश्वास ठेवून घाईघाईने धूळपेरणी करत कपाशी बियाण्याची लागवड केली. परंतु अंदाज फसला आणि शेतकरी संकटात सापडला आहे.” – “””शेतकरी संतोष औटी “” ___________________ केली. मात्र, अंदाज फोल ठरल्याने आणि विहिरींना पाणी नसल्याने उगवलेली रोपे आता करपू लागली आहेत. गेल्या वर्षी २२ जून २०२५ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे याच काळात ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. शेतीबरोबरच परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अत्यंत बिकट झाला आहे. गावोगावी विहिरींनी तळ गाठला असून हातपंपांचे पाणी आटले आहे. पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैल पायपीट करावी लागत असल्याने प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. येत्या चार-पाच दिवसांत पाऊस न आल्यास खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात येणार आहे. त्यामुळे पेरणी लांबल्यास प्रशासनाने शेतकऱ्यांना मदत पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.



