pub-7425537887339079
ब्रेकिंग

स्वाधार योजनेतील ऑनलाईन अर्जातील त्रुटींची पूर्ततेसाठी 29 एप्रिल पर्यंतची मुदतवाढ

0 4 2 0 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.22

शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या किंवा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विदयार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुलां-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2025-26 स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 31 डिसेंबर, 2025 पर्यंत वाढविण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आहेत, त्यांनी दिनांक 29 एप्रिल, 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने त्रुटी पूर्ण करण्याकरीता अंतीम मुदत देण्यात येत आहे. विहीत मुदतीत त्रुटी पुर्ण करून अर्ज फेर सादर न केल्यास अर्ज अपात्र, बाद ठरतील. असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या विशेष अधिकारी शासकीय निवासी शाळा स्नेहल मोदाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 0 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे