pub-7425537887339079
ब्रेकिंग

विद्यार्थ्यांनी टेलिस्कोप सोलर फिल्टरने सूर्यदर्शन करून घेतला आनंद.

0 4 2 0 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.22

कै.बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालय जालना येथे “अस्ट्रोफाईल्स”यांच्या सहकार्याने ‘सूर्य दर्शन कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी सोलर फिल्टरचा वापर करून दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केले आणि सनस्पॉट्स तसेच सूर्याविषयीचे वैज्ञानिक ज्ञान आत्मसात केले. आजच्या काळात पारंपरिक शिक्षणातून अनुभवाधारित शिक्षणाकडे होत असलेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. विद्यार्थ्यांना पृथ्वीवरील ऋतू हे पृथ्वीच्या अक्षाच्या झुकावावर अवलंबून असतात, तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पृथ्वीवर दिवस हा रात्रीपेक्षा मोठा असतो, हे समजले. सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मुख्याध्यापिका श्रीमती.मीनाक्षी कुलकर्णी यांनी अमन सिंह सर मित पांचाळ सर,अभिषेक पांचाळ सर या मुंबईहून आलेल्या टीमचे स्वागत केले. यावेळी संदीप इंगोले, मदन सोजे, भीमाशंकर जवळेकर, राजाराम साबळे, प्रगती भालेकर, अलकनंदा गाडेकर, वंदना नन्नवरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 0 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे