टेंभुर्णी येथे पाऊसाची जोरदार बॅटिंग. बाजारात पाणीच पाणी ,रखडलेली पेरणीला होणार सुरवात.

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.23
टेंभुर्णी सह परिसरात मिरगाच्या पाऊसाची प्रतिक्षा संपली असून पहिल्याचा पावसाने जोरात हजेरी लाऊन सगळी कडे पाणीच पाणी केल्याने शेतकरी राजा सुखावला असून मोठ्या पाऊसाने शेतकरी आनंदी झाल्याचे दिसून आले. पाऊस कधी येणार ही खूप चिंता वाढली होती.मात्र उशीर येणार हे माहित असल्याने शेतकरी यांनी पेरणी केली नव्हती मात्र आता झालेल्या जोरदार पावसाने नक्कीच शेतकरी आता आपल्या शेतीच्या कामाला लागून आपली कामे पूर्ण करतील. मृग नक्षत्र कोरडे गेले असले तरी उशीरा पण जोरदार आलेल्या पावसाने मात्र शेतकरी राजा या पाऊसाने नक्की सुखावणारा असून सगळी कडे आनंदाचे वातावरण दिसून आले. टेंभुर्णी ला आठवडी बाजार सोमवारी असल्याने पाऊस येणार असे कोणतेच चिन्ह नसल्याने आणि आलेल्या जोरदार पाऊसाने भाजी घेणाऱ्या आणि विकणाऱ्या दोघांची खूप परेशानी झालेली दिसली. शेतात सगळी कडे पाणीच पाणी झालेले दिसून आले. शेतकरी राजा या वेळी मोठ्या आनंदात दिसले.



