सुप्रसिद्ध उद्योजक तथा शिक्षणमहर्षी नरसू पाटील यांच्या शुभहस्ते ‘रायगड संदेश’च्या सातव्या दिवाळी अंकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले. या प्रकाशन सोहळ्यामुळे ‘रायगड संदेश’च्या पत्रकारितेच्या प्रवासात आणखी एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद टप्पा जोडला गेला आहे.
मराठी पत्रकारिता, साहित्य आणि वाचन संस्कृतीचा वारसा जपण्याच्या उद्देशाने ‘रायगड संदेश’च्या माध्यमातून गेल्या सात वर्षांपासून सातत्याने विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय विषयांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. याच परंपरेचा भाग म्हणून यंदाचा सातवा दिवाळी विशेषांक वाचकांच्या भेटीला आला आहे.
दिवाळी अंक ही केवळ साहित्याची मेजवानी नसून समाजातील विचार, अनुभव, भावना आणि परिवर्तनाचे प्रतिबिंब असते. नवोदित लेखक, कवी आणि साहित्यिकांना आपले विचार मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच नव्या पिढीमध्ये वाचन आणि लेखनाची आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
शिक्षणमहर्षी नरसू पाटील यांच्या हस्ते झालेल्या या प्रकाशनामुळे ‘रायगड संदेश’ परिवाराचा उत्साह द्विगुणित झाला. सात वर्षांच्या या प्रवासात वाचक, जाहिरातदार, लेखक, कवी, हितचिंतक आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हा टप्पा गाठता आला असल्याची भावना संपादक विशाल सावंत यांनी व्यक्त केली.
सातत्य, सामाजिक बांधिलकी आणि निर्भीड पत्रकारितेचा वारसा जपत ‘रायगड संदेश’ची वाटचाल अशीच पुढे सुरू राहणार आहे.
या प्रसंगी कोकण लेखनीचे संपादक आसिम शेख, आर पी आयचे युवा नेते अक्षय आहिरे आदि सह मान्यवर उपस्थित होते
दिव्यांगांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी राज्यव्यापी लढाई साठी नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालय येथे दि. २५ नोव्हेंबर पासून बे मुध्दत धरने आंदोलनात सहभागी व्हा चंपतराव डाकोरे पाटिल
1 hour ago
अत्याचार पीडित मृत व्यक्तीच्या पात्र वारसांना शासकीय/निमशासकीय सेवेत नोकरीसाठी 20 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
1 hour ago
जनगणना 2027 चे वेळापत्रक जाहीर; 10 जानेवारीपासून स्व-गणनेची सुविधा
1 hour ago
जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांची रेवगाव येथे क्षेत्रभेट; विविध उपक्रमांची पाहणी व ग्रामस्थांशी संवाद
2 hours ago
उरण तालुक्याचे सुपुत्र सुधीर मुंबईकर राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित
2 hours ago
तोगरे दांपत्य तर्फे औषधे दान. समाजापुढे उभा केला नवा आदर्श.