“दिवाळी सण साजरा करूया, चला तोंड गोड करूया, आदिवासी वाडीत मिठाई वाटूया” या संकल्पनेतून सालाबाद प्रमाणे सोमवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ रोजी वनवासी कल्याण आश्रम उरण तालुका च्या वतीने वेग वेगळ्या वाड्यांवर मिठाई वाटप ,कपडे वाटप चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जनजाती बांधवांना घरोघरी जाऊन काही ठिकाणी एकत्र अश्या अक्कादेवी वाडी ३५ कुटुंब , केल्याचे माळ ४५ कुटुंब आणी विंधणे वाडी ६० कुटुंबांना दिवाळीच्या शुभेच्छा , मिठाई ,आणि महिलाना साड्या देण्यात आल्या .
परतीचा प्रवास करताना चिरनेर येथे वीटभट्टीवर काम करणारे आदिवासी १०कुटुंबांना आणि मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा, मिठाई, साड्या , कपडे दिले. या कार्यक्रमासाठी वनवासी कल्याण आश्रम उरण अध्यक्ष मनोज ठाकूर, सचिव कुणाल सिसोदिया, ऍड .आकाश शहा, मीराताई पाटील, वर्षा अधिकारी, दीपक गोरे, सुनंदा कातकरी, बळीराम पेणकर हे कार्यकर्ते उपस्थित होते.बिना इन्व्हेस्टमेंटचे विपुल सर्वय्या ,सोहम दरणे ,विकास कडू यांचे मोलाचे सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले.