कै.मारोतराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्याल याच्या निकालाची परंपरा कायम
शाळेमधून प्रथम येण्यात मुलींचीच बाजी..

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.9
जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी येथील कै.मारोतराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टेंभूर्णी या शाळेचा शालांत प्रमाणपत्र निकाल 83% टक्के लागला असून, शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये खालील प्रमाणे कु. श्रावणी विष्णु भागवत हिने 91.टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला व शिवानी लक्ष्मण उखर्डे हिने 86.60 गुण मिळवत द्वितीय क्रमांक, आदित्य मोहन मुनेनानिक याने 85.40 टक्के गुण घेऊन तृतीय, सुजाता बापू देशमुख,हिने 81 टक्के गुण घेऊन चतुर्थ, तर पूजा राघव भोजने हिने 79.20 टक्के गुण घेऊन पाचवा क्रमांक पटकावला असुन यावेळी मुलांपेक्षा मुलींनीच जास्त गुण मिळवत बाजी मारली आहे. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला असून,संस्थेचे अध्यक्ष मा.दिनकरराव पा.देशमुख, भगवानराव देशमुख, ॲड, सुरेश देशमुख,संदीपराव देशमुख,डॉ.आनंद देशमुख यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री समाधान दूनगहू,पालक श्री शंकर भागवत बालू उखर्डे सुरेश उखर्डे. बापुराव देशमुख,दादाराव म्हस्के ,,जेष्ठ शिक्षक श्री बालू धनवई,संतोष कोल्हे, संभाजी इंडोले, मोहन मुनेमानिक, विजय मघाडे, श्रीमती माया पोटे, विजय काठोळे,एजाज बेग, श्रीमती संगीता विधाते, गणेश आंधळे, प्रल्हाद खारतुडे, सुधाकर वाघमोडे, बालाजी जोशी,सुभाष जाधव, पंजाबराव देशमुख, यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते ….



