जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिव्यांग,वृध्द, निराधाराना न्याय हक्क द्या नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत शेकडो दिव्यांग धरने आंदोलनात सहभागी

नांदेड/प्रतिनिधी,दि.27
दि. २५ नोव्हेंबर पासून जिल्हाअधिकारी नांदेड येथे दिव्यांग,वृध्द, निराधाराना हक्क द्या नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी साठी बे. धरने आंदोलन महाराष्ट्र दिव्यांग राजकीय प्रतिनिधी तथा दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र कार्यकारी समन्वयक तथा संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली दिडशे दिव्यांग वृध्द निराधार अनेक घोषणेने परिसर दणाणून टाकला.
दिव्यांग वृध्द निराधार बाधवाना न्याय हक्क मिळावा म्हणून नांदेड जिल्हाधिकारी यांनी दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या पदाधिकारी व सर्व विभाग प्रमुखासोबत बारा बैठका एक सुनावणी घेऊन ईतिवृतातील अवलोक अहवाल तात्काळ द्यावा म्हणून जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी,दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांनी अनेक वेळा आदेशित करून कनिष्ठ अधिकारी यांनी ईतिवृतातील प्रश्न तर सुटलेत नाहित पण वरिष्ठांनी ईतिवृतातील अवलोकन अहवाल मागणीचे साधे ऊतर देत नसल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार हक्क देता येत नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत दि. २५ नोव्हेंबर पासून बे. मुध्दत ऑफिस वेळेनुसार नांदेड जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग वृध्द निराधार ठाण मांडुन आंदोलनात सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग संघटनेच्या वतीने लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन जागे करण्यासाठी ज्या दिव्यांग, वृध्द, निराधार बांधवाना चालता येत, बोलता येत नाही,ऐकु येत नाही दिसत नाही अशा दिव्यांग बांधव पडत झडत महाराष्ट्रभर जागोजागी अनेक मोर्चे, धरने, आंदोलन, करुन शासन अनेक दिव्यांगासाठी कायदे करून त्यांची अंमलबजावणी होत नाही. लोकप्रतिनिधी निवडणुकीत दिनदुबळ्याचे कैवारी म्हणून मते घेतात पण एकहि लोकप्रतिनिधी सभागृहात किंव्हा दिव्यांगाच्या आंदोलना समोर येत नाहीत. दिव्यांगाचे दु:ख सर्व सामान्य लोकप्रतिनिधीना कळत नसल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग संघटना एकत्रित येऊन महाराष्ट्रभर जनजागृती करून दिव्यांग राजकीय प्रतिनिधी अभियान समन्वय समिती ची निर्मिती करण्यात आली.
या संघटनेचे वतीने प्रमुख मांगनी दिव्यांग बांधवांसाठी अनेक कायदे शासन जीआर काढले जातात त्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे दिव्यांग संघटना आंदोलन करून लोकप्रतिनिधी, प्रशासन लक्ष देत नाही. कारण सभागृहात दिव्यांग बांधवाचे प्रश्नाला आवाज काढणारा लोकप्रतिनिधी नाही.
म्हणून तामिळनाडू, छतिसगड, राजस्थान या सरकारने दिव्यांगाचे प्रश्न सभागृहात उपस्थित करता यावे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेत ऊदा. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या क्षेत्रात स्थानिक संस्थेत स्विकृत सदस्य लागु केले आहे.
या तिन राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात दिव्यांग राजकीय प्रतिनिधी स्विकृत सदस्य लागु करा.
या राज्यातील लोकप्रतिनिधी आमदार जनतेचे सेवक करोडो रूपयाची संपती असताना
त्यांना ऊत्पनाची कोणतीहि अट नाही व त्यांना दरमहा तिन लाख सात हजार रूपये मानधन, व भते मिळतात तेहि वेळेवर पण याच राज्यातील मतदान करणारे दिनदुबळे दिव्यांग, वृध्द निराधाराना कोणतेहि ऊत्पनाची स्त्रोत्र नसलेले रस्त्यावर भिक मांगनाऱ्याना ऊत्पनाची अट कुंटुबातील उत्पन्न एकविस हजार, नसेल तर द्रारिद्र रेषेचे प्रमाणपत्र असे किचकट नियम फक्त दिनदुबळ्याना नियमात बसतील अशा दिव्यांग बांधवाना अडीच हजार व वृध्द निराधाराना दरमहा दिड हजार त्यात दुध तरी येते काय? यांचा विचार लोकप्रतिनिधी का करीत नाहीत करोडोंची संपती असणाऱ्याना ऊत्पन्नाची मर्यादा नाही दिव्यांग वृध्द निराधाराना ऊत्पनाची अट का?
दिव्यांग वृध्द निराधाराना किमान जगण्याची दरमहा सहा हजार मानधनात वाढ व्हावी म्हणून अनेक दिव्यांग संघटनेनी केलेल्या चळवळीची दखल महाराष्ट्रातील चौदा खासदार, चाळीस आमदारानी जागे झाले व कागदावर शिफारस करीत आहे . पण त्यांनी आता हिवाळी अधिवेशनात आपल्या पहाडी आवाजात सभागृहात दिनदुबळ्याचे मांडुन एकमताने शासनास निर्णय घेण्यासाठी एकत्रित येऊन मतदान वेळी दिनदुबळ्याचे कैवारी म्हणाऱ्यानी खरे कैवारी असल्याचे दाखवावे असे प्रसिद्धिपत्रक म्हटले आहे
प्रमुख मागण्या
१) दिव्यांग बांधवांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत स्विकृत सदस्य लागु करा.
२)दिव्यांग वृध्द निराधाराना दरमहा सहा हजार मानधनात वाढ करा.
३) दिव्यांग वृध्द निराधाराच्या
व अनेक प्रश्नासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांनी बारा बैठका व एक सुनावणी घेऊन ईतिवृतातील अवलोकन अहवाल न देणाऱ्या कनिष्ठ अधिकारी यांच्या वर दप्तर दिरंगाई कायदा व दिव्यांग कायद्याने कठोर कारवाई करा.



