pub-7425537887339079
ब्रेकिंग

मोरा सागरी पोलीस ठाणे, नवी मुंबई हद्दीत आढळला अनोळखी बेवारस इसमांचे मृतदेह.

0 4 6 9 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24

मोरा सागरी पोलीस ठाणे, नवी मुंबई हद्दीत अनोळखी बेवारस इसमांचे मृतदेह आढळून आले आहे.मोरा सागरी पोलीस ठाणेकडे अकस्मात मयत रजि नं ०७/२०२६ बी.एन.एस.एस. कलम १९४ दि. १२/०७/२०२६ मधील अज्ञात बेवारस इसमाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे, सदरचा मृतदेह हा कुजलेल्या स्थितीत आहे. सदर मृताच्या अंगावर आकाशी रंगाची हाफ पॅन्ट व राखाडी रंगाचा चौकटीचा शर्ट, हिरवट रंगाची अंडरवेअर, कमरेस लेदर बेल्ड त्यामध्ये कमरेस चप्पल खोचलेली आहे. सदर मृतदेह आढळून आल्याने मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे तसेच सदर व्यक्ती कोण आहे याचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.तरी वरील वर्णनाचे अनोळखी बेवारस इसमा बाबत कोणाला माहिती असल्यास किंवा त्यांचे कोणी नातेवाईक असल्यास त्यांनी मोरा सागरी पोलीस ठाणे, नवी मुंबई संपर्क क्रमांक 8655354120 या नंबर वर संपर्क साधावे. कोणाला या अनोळखी इसमाची ओळख पटल्यास त्वरित कळवावे असे आवाहन मोरा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरज आहिरे (मोबाईल नंबर 9082369659 )यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 9 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे