pub-7425537887339079
ब्रेकिंग

नामगजराने भारती विद्यापीठ सेवाकेंद्र दुमदुमले

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

पुणे/आत्माराम ढेकळे,दि.16

श्री विभुषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी व परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशिर्वादाने आयोजित “नामगजर सोहळ्याने”अवघे भारती विद्यापीठ सेवा केंद्र दुमदुमले.. पुणे जिल्हा पर्वती तालुका अंतर्गत ‘भारती विद्यापीठ सेवा केंद्र ‘ येथे रविवार दि.१४ जुन २०२६ रोजी या “नामगजर सोहळ्याचे ” आयोजन करण्यात आले होते.यामध्ये सेवाकेंद्रातील नित्यनियमाच्या संतसंग मधील प्रवचनाचा लाभ गुरुबंधु -गुरुभगिनी यांनी घेतल्यानंतर नामगजर सोहळ्यात दिव्यप्रतिमेचे पूजन,विधीवत पूजा,सामुहिक नामगजर व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.प्रामुख्याने या सोहळ्यात प्रारंभी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या प्रतिमेस नामगजर सोहळा स्थानी आणुन पुष्पहार घालण्यात आले.व दीपप्रज्वलन करुन विधीवत मंत्र उच्चार करुन पूजन करण्यात आले.यावेळी सोहळ्यातील यजमान म्हणून श्री व सौ. गायकवाड व श्री व सौ.गाढवे हे होते.नामगजर सोहळ्यात “गणी गण गणात बोते”..च्या नामघोषात ताल धरुन सर्व साधक गुरुबंधु -भगिनी यांनी उत्साहाने नामगजर केला.तर सोहळ्यात विणा घेऊन देखील सर्वांनी मान व्यक्त केला.सोहळ्यात लहान बालक-मुले देखील सहभागी झाले होते.त्यांनीही विणा घेऊन नामगजर केला.हे या सोहळ्यात आकर्षण ठरले.भगिनींनी फुगडीची परंपराही सादर केली.नामगजर प्रसंगी “हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ..गुण गाईन आवडी हेचि माझे सर्व जोडी..” सोहळ्यात भजन व सांगता आरती पंकज गुप्ता यांनी सुमधुर आवाजात सादर केले.मृदंगावर हर्ष गायकवाड व संतोष भांबुरे यानी साथ दिली.हा नामगजर सोहळा यशस्वी करण्यास भारती विद्यापीठ सेवा केंद्र समिती पदाधिकारी ,साधक गुरुबंधु ,भगिनी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.शेवटी महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे