pub-7425537887339079
ब्रेकिंग

मास्टर मरीन मेहेर यार्ड -खोपटे कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन ! 

0 4 9 7 3 3
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27
  उरण तालुक्यातील खोपटे येथील मास्टर मरीन मेहेर यार्ड कंपनीविरोधात स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावर तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गुरुवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून गेट बंद आंदोलन करण्यात येणार आहे.मोठेखार (वरचा भाग )प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना खोपटे बांधपाडा यांच्या माध्यमातून  सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना व स्थानिक नागरिकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा आणि स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.
कंपनीच्या प्रकल्पांमध्ये स्थानिक कामगारांना प्राधान्य देऊन त्यांना लोकल लेबर, सर्व्हेअर आणि हाऊसकीपिंगसारख्या विविध कामांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. स्थानिक तरुणांना रोजगारासाठी संधी मिळाल्यास परिसरातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल, अशी भूमिका आंदोलकांकडून मांडण्यात येत आहे.
कंपनीमध्ये सुरू होणाऱ्या रोजगार-व्यवसायाच्या संधींमध्ये ७/१२ धारक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सामावून घ्यावे, अशी दुसरी महत्त्वाची मागणी करण्यात येणार आहे. प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शेतकरी कुटुंबांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधींमध्ये योग्य स्थान मिळावे, अशी आंदोलकांची अपेक्षा आहे.
या मागण्यांकडे कंपनी व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून खोपटे येथील मास्टर मरीन मेहेर यार्ड कंपनीच्या ठिकाणी  मोठेखार (वरचा भाग )प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना खोपटे बांधपाडा यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गेट बंद आंदोलन होणार आहे. संबंधित कंपनी व्यवस्थापनाने या मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्थानिक रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागणार का ? याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 7 3 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे