pub-7425537887339079
ब्रेकिंग

“उरणचे वपोनि हनीफ मुलाणी यांना पदोन्नती; राज्य गुप्तवार्ता विभागात अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती”

0 4 4 9 7 7
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25

उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी यांची राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई येथे अपर पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस दलासह सर्व स्तरातून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे. सोशल मीडियावर ‘आदरणीय वपोनि. श्री मुलानी सर, आपणास अपर उपयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई येथे पदोन्नती मिळाल्याने आपले हार्दिक अभिनंदन’ अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होत असून सहकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हनीफ मुलाणी यांनी उरण पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, किनारपट्टी सुरक्षा आणि मच्छिमारांच्या समस्यांचे निराकरण यासाठी सातत्याने प्रयत्न केले. पावसाळी मासेमारी बंदीची प्रभावी अंमलबजावणी, सागरी सुरक्षेच्या दृष्टीने करंजा मच्छिमार सोसायटीत मच्छिमारांची बैठक घेऊन जनजागृती करणे, अवैध धंद्यांवर कारवाई आणि संवेदनशील प्रकरणे हाताळण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यकाळात उरण पोलीस ठाणे हद्दीत नागरिक आणि पोलीस यांच्यातील समन्वय अधिक बळकट झाला. राज्य गुप्तवार्ता विभाग ही महाराष्ट्र पोलिसांची अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील शाखा असून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसमोरील आव्हाने, दहशतवादी कारवाया, संघटित गुन्हेगारी आणि अंतर्गत सुरक्षेसंबंधी गोपनीय माहिती संकलित करून शासनाला अहवाल देणे, ही या विभागाची प्रमुख जबाबदारी आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईसह राज्यभरातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल झाले असून पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नतीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत आणि याच फेरबदलात हनीफ मुलाणी यांची अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. हनीफ मुलाणी यांच्या पदोन्नतीबद्दल उरण पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, सागरी सुरक्षा शाखेचे अधिकारी तसेच मच्छिमार सोसायटीचे पदाधिकारी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. “मुलाणी साहेब अत्यंत शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि जनतेशी थेट संवाद साधणारे अधिकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य,” अशी भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली. राज्य गुप्तवार्ता विभागासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाल्याने पोलीस दलाची कार्यक्षमता आणखी वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. हनीफ मुलाणी यांची कारकीर्द अनेक आव्हानात्मक नेमणुकांनी सजलेली असून आता राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे