pub-7425537887339079
ब्रेकिंग

जाफराबादेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केले भारुड, भजन, गवळण गायन

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.11

केंद्र व राज्यातील सत्ताधारी – महायुती सरकारने धर्म व – जातीच्या मुद्द्यांवर समाजात भेद निर्माण करून निवडणुका जिंकल्या. मात्र, निवडणुकीपूर्वी -दिलेल्या आश्वासनांचा सत्तेत आल्यानंतर विसर पडला, असा – आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष – कल्याण दळे यांनी केला. दरम्यान, – या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी राम – मंदिरातील चोरी प्रकरणात जाफराबाद येथे काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी देण्यासाठी – भजन, भारुडाचे गायन केले. – पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या – आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय बनकर, पर्यावरण – विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश – गवळी, ज्येष्ठ नेते सुरेश वाकडे, – ज्ञानेश्वर शिंदे, माजी सरपंच – नासिरखाँ पठाण, बदर चाऊस, – शहराध्यक्ष मेहबूब पठाण, नितीन – गौतम, जावेद सिद्दिकी, हरुण पठाण, प्रमोद फदाट, मुरलीधर भोपळे, भरत अंभोरे, शे. मस्जिद, राजाभाऊ कुलकर्णी, शांतीलाल बनसोडे, विनोद सुरडकर आदी
उपस्थित होते. दळे म्हणाले की, वाढती महागाई, गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही सरकारचे पुरेसे लक्ष नसल्याचा आरोप त्यांनी केला. सार्वजनिक व शासकीय मालमत्ता विकण्याचा सपाटा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर त्यांनी टीका केली. काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नाही. तो शेतकरी, कामगार, कष्टकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारी विचारधारा आहे.

जनतेच्या सोडविण्यासाठी अडचणी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सातत्याने काम करीत आहेत. आगामी काळात काँग्रेस व महाविकास आघाडीची सत्ता येईल. विकास कसा करायचा हे जनतेला दाखवून देऊ, असा विश्वास दळे यांनी व्यक्त केला. यावेळी अशोक उबाळे, रऊफ परसुपारे, हरुण पठाण, विनोद सुरडकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख मोईज, रहीम तांबोळी, गणेश आडे, रघुनाथ पाचे, जहीर पठाण, शुभम मुळे, अहमद पठाण, बबन पाटील, अमीर मिर्झा, केशव भिसे, हनीफ कुरेशी, चांद कुरेशी, शेख रियाज, हारुण खान, संतोष खंडागळे आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे