0
5
0
0
7
7
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.31
उरण तालुक्यातील खोपटे येथील मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार व व्यवसायाच्या संधींमध्ये सामावून घ्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून गेट बंद आंदोलन सुरू होते. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी या आंदोलनाचे ३ रे दिवस होते.मात्र आक्रमक पणे लोकशाही व कायदेशीर व शांततेच्या मार्गाने केलेल्या या आंदोलनाला , लढ्याला यश आले असून दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आले असून १९ स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यां पैकी १० माणसे २ दिवसात व उरलेली ९ माणसे पुढील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात कामावर घेण्याचे मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनी प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामुळे स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला. सर्व राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी समाधान, आनंद व्यक्त केला.मात्र सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कामावर घेतले नाही तर परत उग्र आंदोलन करण्याचा इशारा मोठेखार (वरचा भाग) प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना, खोपटे-बांधपाडा यांनी दिला आहे .
मोठेखार (वरचा भाग) प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना, खोपटे-बांधपाडा यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले होते . स्थानिक नागरिक आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते. शेवटी या आंदोलनाला यश प्राप्त झाले असून स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
संबंधित मागण्यांसंदर्भात आंदोलनाच्या पहिल्या दिवशी कंपनी प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्याने आंदोलकांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. शेवटी तिसऱ्या दिवशी न्याय मिळाला.
आमदार महेश बालदी,माजी आमदार मनोहरशेठ भोईर,भाजपा युवा नेते प्रशांत ठाकूर, शिवसेना नेते बी एन डाकी,महाविकास आघाडीच्या नेत्या तथा उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर,पंचायत समिती सदस्य दिपक भोईर, पंचायत समिती सदस्य कविता रुपेश पाटील,कामगार नेते रवि घरत, मनसेचे तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, शिवसेनेचे महेंद्र पाटील,काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे,सभापती राजेंद्र म्हात्रे, पोलीस पाटील रंगनाथ पाटील, माजी सरपंच विशाखा ठाकूर, माजी सरपंच प्रीती पाटील, माजी सदस्य अविनाश ठाकूर, भाजपा नेते किरण म्हात्रे ,माजी सदस्य विश्वास पाटील, उद्योजक देवेंद्र पाटील,मनसेचे विभाग अध्यक्ष बबन ठाकूर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील,शशी म्हात्रे बेलपाडा,शशिकांत हरिश्चंद्र म्हात्रे बेलपाडा,राजेश बबन म्हात्रे बेलपाडा,परेश म्हात्रे बेलपाडा,संतोष ठाकूर तालुका प्रमुख उरण शिवसेना (चिरनेर), खोपटे (बांधपाडा )ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटील,उपाध्यक्ष अलंकार पाटील,सचिव कुमार ठाकूर,हसूराम घरत यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.या सर्वांमुळे हे आंदोलन यशस्वी होऊन मागण्या मान्य झाल्या.
मोठेखार (वरचा भाग) प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना, खोपटे-बांधपाडा यांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वच राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था संघटना, विविध सामाजिक कार्यकर्ते, गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत बांधपाडा (खोपटे ),ग्रामस्थ मंडळ आदी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
5
0
0
7
7




