pub-7425537887339079
ब्रेकिंग

माहोरा ग्रामसंसदेत अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

0 4 6 9 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.23

जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा येथील ग्रामसंसद कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी सरपंच गजानन पाटील लहाने होते. यावेळी बोलताना सरपंच लहाने म्हणाले की, अजितदादा सारखा नेता पुन्हा महाराष्ट्राला लाभणे कठीण आहे. पवार कुटुंब हे मूळचे शेतकरी कुटुंब आहे. त्यामुळे त्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची पूर्ण जाण आहे. लोकसभेपासून ते विधान भवनापर्यंत पवार कुटुंबाने नेहमीच शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली आहे. स्वतः कष्टकरी आणि शेतीनिष्ठ असल्यामुळेच पवार कुटुंबाला शेतक-यांचे प्रश्न चांगले समजतात. जयंतीनिमित्त अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या सामाजिक व शेतकरी हिताच्या कार्याला सलाम करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब पा. जाधव, भगवानराव लहाने, उपसरपंच भास्कर सोनुने, सय्यद हबीब सय्यद कमाल, भानुदास बोर्डे, दादाराव गडकरी, लक्ष्मण वाघ, भीमराव बोर्डे, रामदास मोरे, सय्यद ईसुब, संतोष गौरकर, गणेशराव लहाने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भानुदास बोर्डयांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 9 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे