पाणीपुरवठा व समाज सेवेमधील योगदान आजही जनता विसरलेली नाही, मानव सेवा मंडळातर्फे सर्जेराव शिंदे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार (

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.3
जालना जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव विठोबा शिंदे ३१ मे २०२६ रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने टेंभुर्णी येथील मानव सेवा मंडळातर्फे त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला. सर्जेराव शिंदे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून जनसेवेचा वसा घेतला. तसेच कार्यकारी अभियंता पदावर काम करताना त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांसाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात चौकट:– लोकाभिमुख कामाला प्राधान्य शिंदे साहेबांनी प्रशासकीय सेवेत असताना नेहमीच लोकाभिमुख कामाला प्राधान्य दिले. पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर त्यांनी संवेदनशीलतेने काम केले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे सामाजिक कार्यातील मार्गदर्शन आम्हाला लाभेल. सर्जेराव शिंदे यांचे काम हे आजही जनता विसरलेली नाही आणि इथून पुढेही विसरणार नाही. सेवाभावी वृत्तीने काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केलेली असल्यामुळे गावाला त्यांच्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. – उपस्थित मान्यवर अनेक गावांना शुद्ध पाणीपुरवठा योजना आणि जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी यांसारखी कामे मार्गी लागली. सत्कार सोहळ्याला मानव सेवा मंडळाचे पदाधिकारी नसीम शेख, संजय निकम, सुनील अंभोरे, संजय राऊत, फैसल चाऊस, ज्ञानेश्वर उखर्डे, अलकेश सोमाणी, बालाजी मगर, डी. आर. मुनेमाणिक, गजानन डोमळे आदी उपस्थित होते. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी सर्वांचे आभार मानून पुढील काळातही सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याची ग्वाही दिली.




