pub-7425537887339079
ब्रेकिंग

थकीत पगार आणि पीएफ न मिळाल्याने टेंभुर्णी ग्रामपंचायत कर्मचारी त्रस्त

५ एप्रिलपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

0 4 0 5 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

टेभुर्णी/दत्ता देशमुख,दि.30

जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनाविरुध्द एल्गार पुकारला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असलेला पगार आणि भविष्य निर्वाह निधी (PF) न मिळाल्यामुळे त्रस्त झालेल्या १४ कर्मचाऱ्यांनी येत्या ५ एप्रिलपासून ग्रामसंसद कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
वारंवार विनंती करूनही दुर्लक्ष
कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, थकीत पगार आणि पीएफ मिळावा यासाठी यापूर्वी ११ मार्च आणि २० मार्च २०२६ रोजी प्रशासनाला विनंती पत्रे देण्यात आली होती. मात्र,प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून, संताप व्यक्त केला जात आहे.

काम बंद आंदोलन आणि उपोषण
येत्या ७ ते ८ दिवसांत थकीत देणी अदा न केल्यास सर्व कर्मचारी काम बंद करून ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजेपासून ग्रामसंसद कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प. जालना),तहसीलदार (जाफ्राबाद), गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी यांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे.

या आंदोलनात विक्रम उकांडे,अजीस शेख करीम,दिगंबर भिसे,बाबू साबळे,कोकीलाबाई भाले, शंकर आढावे,योगेश गायमुखे,रामदास धनवई,कपिल माने,अनिल गायकवाड,अनिस बागवान,ज्ञानेश्वर शेडगे,सुभाष घोडे आणि बाबासाहेब जमधडे या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.

प्रशासनाने आता तरी या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन कर्मचाऱ्यांची देणी तातडीने अदा करावी,अशी मागणी ग्रामस्थांमधूनही होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे