pub-7425537887339079
ब्रेकिंग

पागोटे येथे विद्यार्थी गुणगौरव व सामाजिक उपक्रमांचा प्रेरणादायी सोहळा उत्साहात संपन्न.

0 4 7 2 3 6
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.28

कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था व शिवसेना शाखा पागोटे यांच्या संयुक्त विद्यमाने पागोटे येथे विद्यार्थी गुणगौरव व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . सोमवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता श्री गणेश हनुमान मंदिर, पागोटे येथे हा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला. या कार्यक्रमांतर्गत नवघर जिल्हा परिषद शाळांमधील आदर्श व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, तसेच उरण तालुक्यातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा हा उपक्रम सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे. यासोबतच पागोटे गावातील निराधार व गरजू महिलांना वस्तू वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रमही यावेळी राबविण्यात आला. शिक्षण आणि सामाजिक सेवा यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमातून समाजातील गरजू घटकांना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कार्यक्रमाला विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.विशेषत: मनोहरशेठ भोईर माजी आमदार,गणेश शिंदे उरण माजी नगराध्यक्ष, अतुल ठाकूर नगरसेवक गटनेता, अमित ठाकूर नगरसेवक,प्रेरणाताई पाटील जिल्हा परिषद सदस्य, परेश ठाकूर उपसभापती, दीपक भोईर पंचायत समिती सदस्य, संतोष पवार उरण सामाजिक संस्था सेक्रेटरी, महादेव बंडा माजी उपसभापती, सुनील तांडेल राष्ट्रवादी काँग्रेस नवघर पंचायत समिती, सुजित काशिनाथ पाटील काँग्रेस अध्यक्ष पागोटे, महेंद्र पाटील शिवसेना शाखा प्रमुख पागोटे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार, वस्तू वाटप आणि अन्य सामाजिक उपक्रम पार पडला.या उपक्रमासाठी रायगड जिल्हा परिषद सदस्या प्रेरणा कुणाल पाटील तसेच पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच कुणाल अरुण पाटील यांच्यासह शिवसेना शाखा पागोटे व ग्रामस्थ मंडळ पागोटे यांचे सहकार्य लाभले आहे.विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्याला प्रोत्साहन देणे आणि गरजू महिलांना मदतीचा हात देणे, या दुहेरी उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम पागोटे परिसरातील सामाजिक बांधिलकीचे एक प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. कार्यक्रमाचे उत्तम आयोजन व नियोजन असल्यामुळे उपस्थित मान्यवर,नागरिकांनी व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे व आयोजकांचे कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 2 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे