संस्कार प्रबोधिनी विद्यालयात घुसले पावसाचे पाणी
साचलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा जालना शहर महानगरपालिका प्रशासनाची तत्परता

जालना/प्रतिनिधी,दि.25
जालना शहरातील भाग्यनगरातील संस्कार प्रबोधिनी विद्यालयाच्या परिसरामध्ये कालच्या सततच्या पावसामुळे विद्यालयाच्या मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे शाळेच्या आवारात दूषित व खराब पाण्याचे मोठे डबके तयार झाले होते. या पाण्यातून डास व अन्य रोगजनक जिवाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत शाळेचे सचिव विजय देशमुख यांनी जालना महानगरपालिकेचे इंजिनियर सय्यद, नगरसेवक तथा स्थायी समितीचे सभापती अशोकअण्णा पांगारकर यांचे खाजगी इंजिनियर महेश गाडीवाल आणि महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचार्यांना तात्काळ माहिती दिली. माहिती मिळतात सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी शाळेत आणि परिसरात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली पाणी कसे साचत आहे गटार व्यवस्था कुठे अडकली आहे याची माहिती घेत तात्काळ उपाय योजना आखल्या त्यानुसार पाणी निचर्याचे काम हाती घेण्यात आले. शाळेपुढील आणि परिसरातील साचलेले दूषित पाणी काढून टाकण्यात आले स्वच्छता कर्मचार्यांनी परिसर स्वच्छ केला. या तत्पर मदतीबद्दल शाळेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी, सचिव विजय देशमुख, उपाध्यक्ष केसरसिंह बगेरीया, विनायकराव देशपांडे, मुख्याध्यापक पोळ यांनी जालना शहर महानगरपालिकेचे इंजिनियर सय्यद, स्थायी समितीचे सभापती तथा नगरसेवक अशोक पांगारकर आणि जालना शहर महानगरपालिकेचे सर्व स्वच्छता कर्मचार्यांचे शाळेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. जालना शहर महानगरपालिकेने अतिशय वेगाने आणि जबाबदारीने प्रतिसाद दिल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा धोका टळला. शाळेच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करत या घटनेमुळे भाग्यनगर परिसरात जालना शहर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या तत्पर कार्याची चर्चा होत आहे.



