ब्रेकिंग
मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते होणार

0
4
2
5
7
8
जालना/प्रतिनिधी,दि.29
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67 वा स्थापना दिन समारंभानिमित्त गुरुवार दि.1 मे 2026 रोजी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 8.00 वाजता जालना येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. तरी नागरिकांनी तसेच सर्व शासकीय, निमशासकीय आणि सहकारी संस्थेच्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाखात ध्वजारोहणास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0
4
2
5
7
8




