pub-7425537887339079
ब्रेकिंग

जाफ्राबाद-चिखली रोड कार जळीत प्रकरण : मुख्य आरोपी सुरतमधून अटकेत

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.3

जाफ्राबाद-चिखली रोडवरील गाजलेल्या कार जळीत प्रकरणात जाफ्राबाद पोलिसांना मोठे यश मिळाले असून मुख्य फरार आरोपी नितीन गवळी आणि त्याची प्रेयसी अनिता पंडित यांना गुजरातम धील सुरत येथून अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जालना जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर आणि पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या म ार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने, जमादार राजेंद्र सानप, पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती पंडित यांच्या पथकाने तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे सुरतमध्ये शोधमोहीम राबवली. अखेर एका ठिकाणी पाण्याच्या टाकीखाली लपून बसलेल्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथकाने सुमारे १५ ते १६ तासांचा प्रवास करून गुजरात गाठली. सातत्यपूर्ण पाठपुरावा, तांत्रिक तपास आणि अचूक माहितीच्या आधारे ही मोहीम यशस्वी ठरली. तपासादरम्यान या प्रकरणात एकूण चार आरोपींचा सहभाग समोर आला आहे. तसेच विजय चौहान यांना रंगकामाच्या बहाण्याने बोलावून कटाचा बळी बनविण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आणि स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्यासाठी हा कट रचण्यात आल्याची शक्यता पोलिस तपासत आहेत. यापूर्वी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. आता मुख्य आरोपीही पोलिसांच्या ताब्यात आल्याने कटाची संपूर्ण माहिती, इतर संभाव्य सहभागी आणि पुरावे नष्ट करण्याच्या हालचालींबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची अपेक्षा आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेम ागे पूर्वनियोजित कट असल्याचे तपासातून समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सध्या जाफ्राबाद पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींची सखोल चौकशी केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे