pub-7425537887339079
ब्रेकिंग

नागरिकांनी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने दक्षता घ्यावी

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.29

प्रादेशिक हवामानशास्‍त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्‍ह्यात दि. 31 मे ते 2 जुन 2026 या कालावधीत अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्‍या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी दि. 31 मे ते 2 जुन 2026 रोजी पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्‍या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 40-50 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्‍या ते मध्यम स्‍वरुपाच्‍या पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. तसेच दि. 31 मे ते 2 जुन 2026 रोजी पर्यंत यलो अलर्ट जारी केला असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्‍या ते मध्यम स्‍वरुपाच्‍या पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी वादळी वारे, विजेपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मेघगर्जनेच्‍या वेळी, विज चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विज चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लोंबणाऱ्या तारांपासून दूर रहावे. वीज चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी किंवा झाकून ठेवावी. आपत्कालीन परिस्थितीत जिल्‍हाधिकारी कार्यालयातील जिल्‍हा नियंत्रण कक्ष तसेच नजीकच्या तहसील कार्यालयात, पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. असेही कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे