pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी परिसरात रिमझिम पाऊस; पिकांना मिळाले जीवदान

दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण; खते आणि औषध फवारणीची कामे मार्गी लागणार

0 4 6 9 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.22

टेंभुर्णी कृषी मंडळ परिसरात आज सकाळपासूनच रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना यामुळे जीवदान मिळाले असून, परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यापासून ढग जमा होऊनही पाऊस पडत नसल्याने कपाशी, सोयाबीन, तूर आणि मका ही पिके संकटात सापडली होती. मात्र, आज पहाटेपासून आकाशात काळे ढग दाटून आले आणि सकाळी आठच्या सुमारास हलक्या सरी कोसळल्या. दुपारपर्यंत हा रिमझिम पाऊस अधूनमधून सुरू होता. पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून, शेतकरी कोळपणीसह इतर शेतीकामांसाठी पुन्हा सज्ज झाले आहेत. जमिनीत ओल नसल्याने रखडलेली पेरणी आणि दुबार पेरणीच्या भीतीने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा __________________ पावसाने आम्हाला तारले “सोन्याचे दागिने गहाण ठेवून शेतात पेरणी केली होती. विहिरीत पाणी नसल्याने दुबार पेरणीच्या चिंतेत असताना सोमवारी व मंगळवारी आलेल्या रिमझिम पावसाने आम्हाला तारले.” ऐक शेतकरी _________________________________________

विठुरायाला साकडे घातल्यानंतर शेतकरी पावसाची वाट पाहत होता. “. आज पाऊस आल्याने जीवात जीव आला. आता पीक जगेल ही आशा वाटते. शेतकऱ्यांसाठी शासनाने तोच उपाययोजना केल्या पाहिजे. मे जून जुलै या महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनुदानाची रक्कम खात्यावर शासनाने दिली पाहिजे ही सर्व बळीराजांची मागणी आहे ती शासनाने ऐकली पाहिजे. किरण ची शेती जगली तरच शेतकरी व इतरांचे जगणे सोयीस्कर होईल. – संतोष आवटी शेतकरी __________________ आधार मिळाला आहे. नुकतीच उगवलेली सोयाबीन आणि कपाशीची रोपे तजेलदार झाली आहेत. जमिनीत ओल टिकून राहणार असल्याने खते व औषध फवारणीची कामे

—————————————————————-

दुबार पेरणी टळली “गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. परंतु दोन दिवसापासून रिमझिम पावसामुळे हे दुबार पेरणीचे संकट टळले आहे, तरी पाऊस दमदार झाला पाहिजे या आशेवर शेतकरी जगत आहे. बळीराजाची शेती पावसावरच अवलंबून असल्याने, बळीराजाचे सर्व व्यवहार शेतीवरच असल्याने तो चिंतेत तर आहे. – शेतकरी टेंभुर्णी __________________ मार्गी लागणार आहेत. हवामान विभागाने पुढील दोन-तीन दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 9 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे