pub-7425537887339079
ब्रेकिंग

एससी उपवर्गीकरणाच्या विरोधात २८ जुलै रोजी जाफ्राबादमध्ये विराट जनआक्रोश मोर्चासाठी विविध स्तरातून सहकार्याचा वर्षाव

अनिल बोर्डे यांच्याकडून जलदानाची व्यवस्था,प्रा.अनिल वैद्य यांचे २०० निळे ध्वजांचे योगदान,गौतम कासारे यांच्याकडून १० दिवस विनामूल्य वाहन,सिल्लोडच्या धम्म बांधवांकडून हजारो पोस्टर्स,बॅनर्स आणि झेंडे

0 4 6 4 5 0
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.18

एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात ५९ जातीच्या बांधवांनी मंगळवार,दि.२८ जुलै रोजी जाफ्राबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या विराट जनआक्रोश मोर्चाच्या तयारीला वेग आला असून समाजबांधवांकडून मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळत आहे. जाफ्राबाद तालुक्यासह परिसरातील हजारो नागरिक या मोर्चात सहभागी होणार असल्याने आयोजन समितीने व्यापक नियोजन सुरू केले आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्या हजारो जनसमुदायासाठी नगरसेवक अनिल बोर्डे यांनी जलदानाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच सभास्थळी पिण्याच्या पाण्याचे स्टॉल उभारण्यात येणार असून दिवसभर आंदोलकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मोर्चासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रा.अनिल वैद्य यांनी २०० निळे ध्वज (झेंडे) भेट दिले आहेत. हे ध्वज मोर्चात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना वितरित करण्यात येणार असून मोर्चाला एकसंध आणि शिस्तबद्ध स्वरूप मिळण्यास त्याची मदत होणार आहे. दरम्यान, मोर्चाच्या प्रचारासाठी आणि गावागावातील जनजागृती मोहिमेसाठी गौतम कासारे यांनी सलग दहा दिवस विनामूल्य वाहन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या वाहनाद्वारे तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार,जनसंपर्क आणि मोर्चाचे आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय सिल्लोड येथील धम्म बांधवांनी मोर्चाच्या प्रचारासाठी हजारो पोस्टर्स,बॅनर्स आणि निळे झेंडे उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे मोर्चाच्या प्रचाराला मोठी चालना मिळाली असून संपूर्ण परिसर निळ्या ध्वजांनी सजू लागला आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी समाजातील विविध संघटना,कार्यकर्ते,युवक,महिला आणि ज्येष्ठ नागरिक स्वयंस्फूर्तीने पुढे येत असून हा मोर्चा एससी उपवर्गीकरणाच्या विरोधातील एकजुटीचे आणि सामाजिक ऐक्याचे प्रभावी दर्शन घडविणारा ठरणार असल्याचा विश्वास आयोजक म्हणून उपवर्गीकरण विरोधी समन्वय समितीच्या वतीने व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 4 5 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे