pub-7425537887339079
ब्रेकिंग

काँग्रेसच्या रायगड जिल्हा महिला आघाडीतर्फे अर्जुन पाटील यांना श्रद्धांजली पत्रकार कृष्णा पाटील परिवाराच्या सांत्वनासाठी पंचक्रोशीतील मान्यवरांची रिघ

0 4 6 3 4 1
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17

उलवे नोडमधील मोरावे गावचे ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि वारकरी सांप्रदायाचा वारसा चालवणारे आणि भजन-कीर्तनात आयुष्य जगलेले अर्जुन भोकाजी पाटील यांचे ९ जुलै रोजी निधन झाले. ज्येष्ठ पत्रकार कृष्णा पाटील यांचे ते वडील होत. त्यामुळे दिवंगत अर्जुन पाटील यांना सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. काँग्रेसच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा रेखा घरत, उरण तालुका महिला अध्यक्षा निर्मलाताई पाटील, रायगड जिल्हा महिला चिटणीस सोनाली पाटील, शांता म्हात्रे, सरचिटणीस सविता ठाकूर, तुलसा पंडित, पार्वती पाटील, जयश्री पाटील आदी महिला कार्यकर्त्यांनी दिवंगत अर्जुन पाटील यांना शुक्रवारी (ता. १७) श्रद्धांजली वाहिली. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, युवा अध्यक्ष निखिल ढवळे, किरीट पाटील, वैभव पाटील, लंकेश ठाकूर, उत्तम कोळी, नाना गडकरी आदी मान्यवरही उपस्थित होते. त्यांनीही दिवंगत अर्जुन पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गव्हाणच्या सर्व शिक्षिका, तसेच माजी केंद्रप्रमुख रंजना पाटील, सुहासिनी भगत, वनिता पाटील, मो. का. मढवी गुरुजी, डी. आर. पाटील, मिनल माळी, ‘सकाळ’ वृत्तपत्र समूहाचे आजी-माजी कर्मचारी वृंद, तसेच पंचक्रोशीतील सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांचीही पत्रकार कृष्णा पाटील परिवाराच्या सांत्वनासाठी रिघ लागली आहे. अर्जुन पाटील स्मृतिप्रीत्यर्थ दररोज गरुड पुराणाचे वाचन दत्ता म्हात्रे करीत आहेत, तर परिसरातील विविध भजन मंडळेही आपल्या सुमधुर आवाजात आदरांजली वाहात आहेत. प्रसिद्ध भजन गायक निवृत्तीबुवा चौधरी यांचे भजन शनिवारी (ता. १८) होणार आहे. दिवंगत अर्जुन पाटील यांचे उत्तरकार्य मंगळवारी, २१ जुलै रोजी अर्जुन भवन, मोरावे येथे होणार आहे. त्यानिमित्त महेश महाराज साळुंखे यांचे कीर्तन १० ते १२ या वेळेत होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 3 4 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे