pub-7425537887339079
ब्रेकिंग

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी नामांकने पाठवण्याचे आवाहन

नामांकने पाठवण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2026 • नामांकने, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर, ऑनलाईन सादर करता येणार

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

 जालना/प्रतिनिधी,दि.29

राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीसी) 2026 साठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि कला-संस्कृती अशा विविध क्षेत्रात, अद्वितीय, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांचा, हे पुरस्कार देऊन, सन्मान केला जातो. पाच वर्षे वयाच्या पुढचे आणि 18 वर्षांपर्यंतचे (31 जुलै, 2026 रोजी) कोणतेही मुले/मुली या पुरस्कारासाठी पात्र आहेत. मात्र, ते भारतीय नागरिक आणि भारतात वास्तव्य करणारे असणे आवश्यक आहे. नागरिकांनी मानांकने केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in वरुनच भरावीत. स्वयं-नामांकन आणि कोणीही केलेल्या शिफारसी स्वीकारल्या जातीत. ऑनलाइन आवेदने पाठवण्याची शेवटची तारीख 31 जुलै, 2026 आहे. अधिक सविस्तर माहितीसाठी, कृपया राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलला भेट द्या. (https://awards.gov.in).

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे