pub-7425537887339079
ब्रेकिंग

कै. बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयाचा शालांत परीक्षेत ८१.४८ टक्के निकाल !

0 4 2 5 8 4
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.9

हिंदू समाज संस्था संचलित कै. बाबुराव जाफ्राबा दकर माध्यमिक विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२६ चा निकाल ८१.४८ टक्के लागला असून विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत धनश्री पांडुरंग बनसोडे हिने ८६.६ टक्के गुण मिळवून विशेष श्रेणी प्राप्त केली. तसेच कुणाल भगवान शहाणे याने ८०.४ टक्के गुण मिळवून विशेष यश संपादन केले असून अनुज रवी मुरमे याने ७४.८ टक्के गुण प्राप्त केले. विद्यालयातील १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये, २८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये तर २० विद्यार्थी साधारण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. संजीव देशपांडे, सचिव चंद्रशेखर वाघमारे, उपाध्यक्ष जगदीश बडवे व भगवान धोत्रे, संचालक कुमार देशपांडे, डॉ. विनायक दसरे, नितीन कोळेश्वर, रावसाहेब अवघड, मुख्याध्यापिका श्रीमती.मीनाक्षी कुलकर्णी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 8 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे