pub-7425537887339079
ब्रेकिंग

वीर वाजेकर महाविद्यालयात  गरबा नृत्य चे आयोजन.

0 4 9 5 7 7
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, फुंडे–उरण येथे लायन्स क्लब ऑफ वीर वाजेकर कॅम्पस, भारतीय ज्ञान परंपरा (IKS) समिती व सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त गरबा नृत्य कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आले.
भारतीय संस्कृती, परंपरा आणि लोककलेचे जतन व संवर्धन करणे, विद्यार्थ्यांना पारंपरिक नृत्यकलेची ओळख करून देणे तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. गरबा नृत्याच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचा आनंद साजरा करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना आपल्या सांस्कृतिक वारसा चे महत्त्व समजावे, यासाठी या  उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेहोते
 विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन जल्लोषात गरबा नृत्याचे सादरीकरण केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणीव, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि एकात्मतेची भावना वृद्धिंगत होण्यास मदत होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि  भारतीय ज्ञान परंपरा (IKS) समिती व सांस्कृतिक समिती यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम
आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला अभिमान!” या भावनेतून आयोजित करण्यात आलेला हा गरबा नृत्य उपक्रम भारतीय सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 5 7 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे