जय सावता गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21
गणेशोत्सवाचे औचित्य साधून जय सावता गणेश मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन डॉ. श्रीकृष्ण जाधव, डॉ. रमेश मोठे व डॉ. अविनाश सुरुशे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमात तरुण, गणेशभक्त व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होत एकूण ३७ जणांनी रक्तदान केले. या शिबिरात अमोल जमधडे, विनायक डव्हळे, कृष्णा अंभोरे, ओम जमधडे, भालचंद्र मूळे, शुभम पाबळे, अनिकेत जमधडे, सोमनाथ तांबेकर, रवि खरात, परमेश्वर जाधव, जिवन मुळे, संभाजी जमधडे, पवन खांडेभराड, आशिष बारगुडे, विशाल जमधडे, शुभम डोमळे, रामेश्वर सातभाई, प्रथमेश मुणेमानिक, शुभम जमधडे, रुषिकेश गावंडे, सागर सातभाई, जय जमधडे, सौरभ खरात, समाधान पिंपळे, वैभव सातभाई, आनंद देशमाने, मनोज तांबेकर, अक्षय खरात, जयेश भिसे, आकाश जमधडे, डॉ. श्रीकृष्ण जाधव, शिवाजी जमधडे आदींनी रक्तदान केले. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व रक्तदाते व ग्रामस्थांचे आभार मानले.




