pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी ला नगरपंचायत न झाल्यास,आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर ‘बहिष्कार’; विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांचे दिसले उग्र रूप.

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.13

समस्याचे माहेर घर म्हणजे टेंभुर्णी ना रस्ते ना नाली ना पाणी ना साफ सफाई, सगळी कडे नुसती घाण आणि कोणतेच नियोजन नसल्याने भरीव विकास साठी आता नगर पंचायत ची गरज असल्याने या वेळी विशेष ग्रामसभेत एकच आवाज दिसला. तो म्हणजे टेंभुर्णी आता ग्रामपंचायत नको तर फक्त नगर पंचायत पाहिजे.
जाफ्राबाद तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आणि महत्त्वाचे केंद्र असलेल्या मौजे टेंभुर्णी येथील ग्रामपंचायतीचे रूपांतर ‘नगरपंचायत’मध्ये करण्यात यावे, या न्याय्य मागणीसाठी आता संपूर्ण गाव एकवटले आहे. आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज आयोजित विशेष ग्रामसभेत टेंभुर्णीकरांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. जर शासनाने टेंभुर्णीला तात्काळ नगरपंचायतीचा दर्जा बहाल केला नाही, तर आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२६ वर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा एकमुखी आणि ऐतिहासिक निर्णय समस्त ग्रामस्थांनी घेतला आहे. या संदर्भातील अधिकृत ठरावाचे पत्र आज जाफ्राबाद तहसील कार्यालयाला सादर करण्यात आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
आरक्षण सोडतीच्या सभेतच घुमणार ‘बहिष्काराचा’ नारा!
शासकीय नियमानुसार, आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या सदस्य पदांच्या आरक्षण सोडती संदर्भात आज दिनांक १२ जून २०२६ रोजी टेंभुर्णी येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सभेत उपस्थित ग्रामस्थांनी आरक्षणापेक्षा गावच्या विकासाचा आणि नगरपंचायतीचा मुद्दा लावून धरला.

टेंभुर्णीची लोकसंख्या, विस्तार आणि वाढती बाजारपेठ लक्षात घेता, या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर व्हावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आजच्या सभेत ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत नगरपंचायत घोषित होत नाही, तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया होऊ देणार नाही.
परिपूर्ण प्रस्ताव धूळ खात; वरिष्ठ प्रशासनाचा हलगर्जीपणा!
यापूर्वी सुद्धा टेंभुर्णीच्या ग्रामसभेमध्ये आणि ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये वेळोवेळी कायदेशीर ठराव संमत करण्यात आलेले आहेत. टेंभुर्णीला नगरपंचायतीचा दर्जा मिळण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सर्व तांत्रिक बाबींसह वरिष्ठ कार्यालयाकडे आणि मंत्रालयात सादर करण्यात आलेला आहे. मात्र, राज्य शासनाकडून आणि संबंधित मंत्रालयाकडून या प्रस्तावावर अद्याप कोणतीही ठोस सकारात्मक कारवाई झालेली नाही.प्रशासनाच्या याच दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी अखेर लोकशाही मार्गाने ‘निवडणूक बहिष्काराचे’ हत्यार उपसले आहे.
प्रशासक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत ‘वरिष्ठ पातळीवर’ पत्र रवाना:
ग्रामसभेत झालेल्या या तीव्र उद्रेकानंतर ग्रामसंसद कार्यालय टेंभुर्णीचे प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) श्री.जगदीश आढाव यांनी ग्रामस्थांच्या या भावना आणि बहिष्काराचा अधिकृत ठराव पुढील तातडीच्या कारवाईसाठी वरिष्ठ पातळीवर पाठवला आहे.

हे पत्र माहिती व पुढील कार्यवाहीसाठी खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे:
१) मा. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना.
२) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) साहेब, जिल्हा परिषद जालना.
३) मा. तहसीलदार साहेब, जाफ्राबाद.
४) मा. गटविकास अधिकारी (BDO) साहेब, पंचायत समिती जाफ्राबाद.

प्रशासनासमोर मोठे आव्हान; तोडगा निघणार का ?
टेंभुर्णी हे जाफ्राबाद तालुक्यातील महत्त्वाचे राजकीय आणि व्यापारी केंद्र असल्याने, येथील निवडणुकीवर संपूर्ण गावाने बहिष्कार टाकल्यास राज्य निवडणूक आयोगासमोर आणि जिल्हा प्रशासनासमोर मोठे कायदेशीर संकट उभे ठाकणार आहे. आता जालना जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावर काय तोडगा काढतात आणि टेंभुर्णीला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून देण्यासाठी काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण जाफ्राबाद तालुक्याचे लक्ष लागले आहे.

—————- —————  ———————————-

टेंभुर्णी येथे सामाजिक कार्यकर्ते जनार्दन झोरे आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, गावातीलच सगळ्याच लोकांची इच्छा आहे की, चेंबूरणी ला ग्रामपंचायत ऐवजी नगरपंचायत झाली पाहिजे. नगरपंचायतला ग्रामपंचायत पेक्षा निधी जास्त असतो, अधिकार जास्त असतात. नगरपंचायत ला सांभाळणारा अधिकारी हा क्लास 2 दर्जाचा असतो. अधिकार क्षेत्र मोठे असतात. दबावाला बळी पडणारे अधिकारी नसतात. कोणाच्यातरी इच्छा खातर काम करण्याची इच्छा त्यांची नसते. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाच्या चाकोरीच्या बाहेर ह्या व्यक्ती जात नसतात. व त्यांच्याजवळ निधी वापरण्याचे नियम ठरलेले असतात. त्यामुळे आलेला निधी योग्य मार्गाने खर्च होतो ही यातून सिद्ध होते. आणि त्यासाठी ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा नव्हे तर नगरपंचायतच हवी असे त्यांनी सांगितले. —-जनार्दन झोरे सामाजिक कार्यकर्ता….

——————————————————————

लहू शास्त्र सेनेचे आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की टेंभुर्णी येथील ग्रामपंचायत मधून चाललेला कारभार हा दबावाखाली चालतो. कोणीतरी बाहेरची व्यक्ती हे सर्व संचलित करत असते. त्याना गावातीलच काही व्यक्ती सहकार्य करीत असतात, विकासाची धोरणे एका दहा बाय दहाच्या रूम मध्ये ठरत असतात, आणि तिथूनच सर्व सूत्रे हलतात असा आमच्या निदर्शनास येते आहे, विकासाची सूत्रे हे गावच्या निदर्शनास आली पाहिजे ही आमची भूमिका राहील आणि गावाला नगरपंचायत चा दर्जा नव्हे तर नगरपंचायतच झाली पाहिजे. …. शेख युसूफ..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे